राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री,(Justice) शिवसेना नेते संजय शिरसाट हे आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सिद्धांत यांनी फसवणूक केली असून, त्यांच्याविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी संबंधित महिलेने ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावून केली आहे.संबंधित महिलेच्या दाव्यानुसार, २०१८ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धांत शिरसाट यांच्यासोबत तिची ओळख झाली.

या ओळखीनंतर त्यांची मैत्री झाली आणि चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेट झाली, जिथे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यानंतर सिद्धांत यांनी लग्नासाठी तगादा लावला. मात्र, संबंधित महिला आधीच विवाहित असल्याने, सिद्धांतने तिला भावनिक ब्लॅकमेल करून, ‘लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करेन,’ असा आग्रह धरला. सिद्धांतच्या भावनिक आवाहनावर विश्वास ठेवून दोघांनी लग्न केले, असा दावा संबंधित महिलेने केला आहे.(Justice)संबंधित महिलेने १४ जानेवारी २०२२ रोजी सिद्धांत शिरसाट यांच्यासोबत बौद्ध पद्धतीने लग्नही केल्याचा दावा केला आहे. इतकेच नाही, तर त्याबाबत आपल्याकडे पुरावेही असल्याचा दावा तिने केला आहे. एवढ्यावरच न थांबता, या संबंधातून महिलेला गर्भधारणाही झाली, मात्र सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोपही महिलेने नोटीसमध्ये केला आहे, ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.
दरम्यान, सिद्धांत यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर त्यांच्या वर्तनात बदल झाल्याचा दावा महिलेने केला आहे. सिद्धांतने तिला चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगून छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्यास नकार दिला. सिद्धांत यांचे यापूर्वीचे विवाहसंबंध आणि इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर त्याने धमकी देण्यास सुरुवात केली. “तू जर पोलिसांकडे गेलीस तर मी आत्महत्या करेन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करेन,” अशा धमक्याही देण्यात आल्याचे आरोप महिलेने केले आहेत.

संबंधित महिलेने २० डिसेंबर २०२४ रोजी शाहूनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र, सिद्धांतचे वडील संजय शिरसाट हे मंत्री असल्यामुळे पोलिसांनी कारवाई न करता प्रकरण दाबल्याचा आरोपही कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आला आहे. सिद्धांत शिरसाट यांनी संबंधित महिलेला सात दिवसांच्या आत नांदवण्यासाठी घरी घेऊन जावे आणि न्याय द्यावा, अन्यथा महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.(Justice)या गंभीर प्रकरणातून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सिद्धांत शिरसाट यांनी फोन करून त्रास दिल्यास कुटुंबाला गुंडांकडून संपवून टाकू, अशी धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. माझे वडील मंत्री होणार आहेत आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उजवे हात आहेत, असा दावा सिद्धांतने केल्याचा आरोप महिलेचा आहे, ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.
हेही वाचा :
भाजप नेत्याचा ‘तो’ VIDEO व्हायरल, कार्यालयातच महिलेच्या मिठीत पडून..
‘तुझा नंबर दे… सेक्सी दिसतेस’, सुदेश म्हशीलकरचा मराठी अभिनेत्रीला अश्लील मेसेज
आयपीएल 2025 मध्ये टॉप 2 मध्ये कोण जाणार? जाणून घ्या अंतिम समीकरण