“सोनाक्षी सिन्हाला धरावा लागणार रोजा?”; ‘ते’ फोटो शेअर करताच भडकले नेटकरी
7 सप्टेंबररोजी देशभरात गणरायाचे आगमन झाले. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीच्या(entertainment news) घरी देखील बाप्पा विराजमान झाले. अशात नवीन लग्न झालेलं जोडपं म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती झहीर इक्बाल यांनी देखील लग्नानंतर पहिला गणेशोत्सव साजरा केला. सोनाक्षी नवऱ्यासोबत बाप्पाची आरती करताना दिसून आली. तिने या प्रसंगाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मात्र, या फोटोमुळे पुन्हा एकदा सोनाक्षी नेटकऱ्यांच्या(entertainment news) निशाण्यावर आली आहे. सोनाक्षीने गणेशोत्सवाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.या व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हा पती झहीरसोबत गणपती बाप्पाची आरती करताना दिसत आहे. दोघेही आरतीची थाळी धरून पूर्ण भक्तीभावाने बाप्पाची पूजा करताना दिसत आहेत.
सोनाक्षीने हा व्हिडीओ शेअर करत ‘जेव्हा एक जोडपे खऱ्या अर्थाने एकमेकांच्या श्रद्धांना मान्यता देतात तेव्हा प्रेमाचे रूपांतर आदरामध्ये होते. लग्नानंतरचा आमचा पहिला गणपती’ असं कॅप्शन देखील दिलं आहे. पण या पोस्टमुळे सोनाक्षी आता नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहे.
सोनाक्षीचा व्हिडिओ पाहून एका यूजरने मुस्लीम असूनही इतर धर्माच्या विधीत तू कसा काय सहभागी होऊ शकतो? असा प्रश्न झहीरला विचारला आहे. एका यूजरने ‘सोनाक्षीवर निशाणा साधत आता रमजानमध्ये रोजा धरणार का? असा प्रश्न विचारला आहे. दुसऱ्याने लिहिले की, अरे वा म्हणजे आता सोनाक्षी सिन्हा ही रोजा देखील ठेवणार, असं लिहिलं आहे.
यामुळे सोनाक्षीची ही पोस्ट आता तूफान व्हायरल होत आहे. सोनाक्षीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने निळ्या रंगाचा हेवी लाँग सूट परिधान केला आहे. तसेच केस मोकळे सोडले आहेत. तर अभिनेत्रीचा नवरा झहीरने सोनाक्षीला मॅचिंग डबल शेड ब्लू आणि व्हाईट कुर्ता पायजामा परिधान केला आहे. दोघेही यात फारच सुंदर दिसत आहेत.
हेही वाचा:
अवघ्या काही दिवसांत ‘या’ 5 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू
गणपती बाप्पा पुढच्या वर्षी 11 दिवस आधी ऑगस्ट महिन्यातच विराजमान होणार बाप्पा
बायकोच्या अनैतिक संबंधांमुळं नवऱ्यानं आत्महत्या केल्यास ती दोषी नाही