स्पोर्ट्स, ड्रामा आणि रोमान्स… ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही’चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री जान्हवी कपूर(trailer) हे दोघे सध्या त्यांच्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचा 2 मिनिट 55 सेकंदाचा ट्रेलर(trailer) रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, जान्हवी आणि राजकुमार या दोघांचेही नाव माही असते. या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या जोडप्याची लव्ह स्टोरी ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. मिस्टर अँड मिसेस माही यांना क्रिकेटची आवड असते. अशातच हे दोघे कसे त्यांची क्रिकेट खेळण्याची इच्छा पूर्ण करतात हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा चित्रपट नक्कीच कमालीचा असणार आहे, असं ट्रेलर मधून बघायला मिळतंय. सर्वात पॉवरपॅक परफॉर्मर राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा हा दुसरा प्रोजेक्ट आहे. दोघांनी यापूर्वी ‘रुही’ या चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर केली आहे.

शरण शर्मा दिग्दर्शित मिस्टर अँड मिसेस माही 31 मे रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय राजकुमार हा ‘स्त्री 2’ आणि ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा :

नरेंद्र मोंदींनी शरद पवार, उद्धव ठाकरेंना का दिली ऑफर? प्रकाश आंबेडकर

गरीबांना 200 यूनिट वीज मोफत, वर्षभरात दोन कोटी नोकऱ्या; केजरीवाल यांच्या देशाला 10 गॅरंटी

”चंद्रकांत पाटलांना काय कळतं?, फक्त तेरे नाम’ भांग पाडून फिरत असतात”; जरांगे पाटलांनी उडवली खिल्ली