आमदार मित्राच्या घरी गेलेल्या अल्लू अर्जुनवर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चाहता वर्ग मोठा आहे(police). त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात.पण अल्लू अर्जुन सध्या अडचणीत सापडला आहे. काल (शनिवार) अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 मे रोजी तो आंध्र प्रदेशातील नंदयाल येथे पोहोचले होता. जिथे ते त्याचे मित्र आणि YSRCP चे आमदार शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी हे राहतात.

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना तो रेड्डी यांच्या घरी आल्याचं कळालं. त्यामुळे अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी लोकांनी रेड्डी यांच्या घराबाहेर गर्दी केली. पण यानंतर पोलिसांनी(police) अल्लू अर्जुन आणि त्याचे मित्र आमदार शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल केला. जाणून घेऊयात या संपूर्ण प्रकरणाबद्दल…

YSRCP चे आमदार सिंगारेड्डी रविंद्र किशोर रेड्डी उर्फ शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी हे पुन्हा निवडणूक लढत आहेत. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अल्लू अर्जुननं रेड्डी यांच्या घरी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हजेरी लावली. अशातच रेड्डी यांच्या घराबाहेरल अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. अल्लू अर्जुनने घराच्या बाल्कनीतून चाहत्यांना बघत होता. यावेळी लोक ‘पुष्पा-पुष्पा’ अशा घोषणा देत होते.

शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी आणि अल्लू अर्जुन यांच्यावर निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्पा रवि चंद्रा यांनी आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन होईल हे जाणून आरओ नंद्याल यांच्या परवानगीशिवाय अल्लू अर्जुनला घरी बोलावले, असे तक्रारीत म्हटले आहे.

“माझा मित्र अल्लू अर्जुन, तू निवडणुकीसाठी मला शुभेच्छा देण्यासाठी नंद्यालपर्यंत प्रवास केल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझा पाठिंबा माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि आमच्या मैत्रीबद्दल मी खूप कृतज्ञ आहे!”, असं ट्वीट आमदार सिंगारेड्डी रविंद्र किशोर रेड्डी यांनी केलं.

हेही वाचा :

आज जुळून आलाय धृती योग! ‘या’ 5 राशींना करिअरच्या नवीन संधी मिळणार

तुफान उसळीनंतर सोने-चांदीची विश्रांती; इतका उतरला भाव

रागीट पार्टनरला ‘या’ टिप्सने हँडल करा; दुसऱ्या दिवशी स्वत: सॉरी म्हणेल