Bajaj Pulsar NS400 पुढील आठवड्यात होणार लॉन्च

बजाज ऑटोने आता प्रीमियम बाईक सेगमेंटवर लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडचे बजाजने त्यांच्या काही बाईक्सच्या अपडेटेड व्हर्जन्स लॉन्च केले आहेत. आता बजाज आपली नवीन बाईक भारतात लॉन्च करणार आहे.

कंपनी Pulsar 400 3 मे रोजी लॉन्च करणार आहे. नवीन मॉडेल Pulsar NS400 या नावाने येईल. नवीन मॉडेल बजाजचे सर्वात पॉवरफुल मॉडेल येणार आहे. भारतात ही बाईक हार्ले डेविडसन X440 आणि रॉयल एनफिल्ड स्क्रॅम 411 सारख्या बाईकशी थेट स्पर्धा करेल.

किती असेल किंमत?

Bajaj Pulsar NS400 ची अपेक्षित किंमत सुमारे 2 लाख रुपये असू शकते. ही बाईक ब्लॅक, ब्लू, रेड आणि सिल्व्हर रंगात सादर केली जाऊ शकते. या बाईकच्या माध्यमातून कंपनी प्रीमियम स्पोर्ट्स बाईक सेगमेंटमध्ये आपला दरारा निर्माण करू शकते. असं असं तरी कंपनी 3 मे रोजीची याची किंमत जाहीर करेल.

इंजिन

बजाज पल्सर NS400 मध्ये 373cc इंजिन दिले जाईल, जे 40bhp पॉवर आणि 35Nm टॉर्क जनरेट करेल. हेच तेच इंजिन Dominar 400 मध्ये देखील देण्यात आले आहे. पण कंपनी या बाईकचे इंजिन आगामी मॉडेलसाठी ट्यून करेल. यात 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप असिस्ट क्लच मिळू शकतात. पल्सर NS400 एका लिटरमध्ये 47kmpl मायलेज देऊ शकते, असं बोललं जात आहे.

बजाज पल्सर NS400 मध्ये कंपनीने अनेक फीचर्स दिले आहेत. याची डिझाईनही स्पोर्टी असेल. ही कार तरुणांना लक्षात ठेवून डिझाईन करण्यात आली आहे. यात यूएसबी चार्जिंग पोर्ट, एलईडी हेडलाइट, स्लीक टेललाइट, स्प्लिट सीट आणि स्प्लिट ग्रॅब रेल यासारखे फीचर्स मिळू शकतो.