सरकारच्या ‘या’ एका योजनेमुळे महिला होतात मालामाल

मुंबई : देशातील नागरिक आर्थिक दृष्टीने सक्षम व्हावेत यासाठी सरकारकडून अनेक योजना(scheme) राबवल्या जातात. यातील काही योजना या तरुणांसाठी तर काही योजना या महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी असतात. सरकारच्या बहुसंख्य योजना या पोस्ट ऑफिस विभागातर्फे चालवल्या जातात. दरम्यान, याच पोस्ट ऑफिस विभागातर्फे खास महिलांसाठी एक योजना चालवली जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यास महिलांना तब्बल 7.5 टक्क्यांनी व्याज दिले जाते. विशेश म्हणजे फक्त दोन वर्षांत महिलांना तब्बल 2.32 लाख रुपये मिळू शकतात.

महिला सेव्हिंग सन्मान सर्टिफिकेट योजना(scheme) सर्टिफिकेट असे या योजनेचे नाव आहे. ही एक स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. महिलांना आर्थिक सहाय्यता मिळावी म्हणून केंद्र सरकारकडून ही योजना विशेष रुपाने चालू करण्यात आली आहे. या योजनेत 1000 रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत पैसे जमा करता येतात. तुम्ही जमा केलेली रक्कम ही 100 रुपयांच्या पटीत असली पाहिजे. या योजनेच्या माध्यमातून एक व्यक्ती कितीही खाते खोलू शकते. पण तुम्हाला या योजनेत जास्तीत जास्त 2 लाख रुपयेच जमा करता येतात. तसेच दुसरे खाते खोलताना तीन महिन्यांचे अंतर असणे गरजेचे आहे.

या योजनेअंतर्गत जमा केलेल्या रकमेवर वर्षाला 7.5 टक्के व्याज दिलं जातं. प्रत्येक तीन महिन्याला हे व्याज तुमच्या खात्यावर जमा केले जाते. या योजनेची मॅच्यूरिटी ही फक्त दोन वर्षांची आहे. असे असले तरी आपत्कालीन स्थितीत तुम्हाला एका वर्षात जमा केलेल्या रकमेच्या जास्तीत जास्त 40 टक्के रक्कम काढून घेता येते. ही आपत्कालीन रक्कम फक्त एकदाच काढता येते.

या योजनेअंतर्गत तुम्ही समजा 2 लाख रुपये जमा केले तर 7.50 टक्के व्याजाच्या हिशोबाने तुम्हाला एकूण 32044 रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला दोन वर्षांत एकूण 2,32044 रुपये मिळतील.

या योजनेअंतर्गत खातेदार महिलेचा अचानक मृत्यू झाला तर त्या महिलेच्या कुटुंबीयांना जमा असलेली रक्कम काढता येते. गंभीर आजारावर उपचारासाठीदेखील या योजनेतून रक्कम काढता येते. पैसे काढून घेतल्यानंतर तुम्ही खाते बंद करू शकता. या योजनेअंतर्गत खाते चालू केल्यवर 6 महिन्यांनतर ते बंद करता येते. अशा स्थितीत तुम्हाला दोन टक्के कमी व्याजाने रक्कम दिले जाते.

हेही वाचा :

प्रियांका चोप्राने सकाळी-सकाळी दाखवला ‘तो’ लूक; नेटकरी घायाळ

रवी शास्त्रीच्या प्रेमात वेडी होती अमृता सिंह, लग्न करणार होते पण…

JioCinema ची ‘ही’ ऑफर पाहून व्हाल शॉक ; वर्षभराचा प्रीमियम प्लॅन फक्त ‘एवढ्या’ किंमतीत!