सावधान ! तासनतास टॉयलेट सीटवर फोन घेऊन बसताय? या समस्या लागतील मागे

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, टॉयलेट सीटवर जास्त वेळ मोबाईल फोन (mobile phone)वापरल्याने मूळव्याध आणि गुदद्वारासंबंधीचा फिस्टुला सारख्या समस्या वाढू शकतात. तज्ज्ञांनी यावेळी शौचालयात फोनचा जास्त वापर आणि बैठी जीवनशैली यांच्यातील संबंधाबद्दल चिंता व्यक्त केली. शहरी भागांमध्ये ही समस्या वाढत असल्याचं दिसून आलं आहे.

टॉयलेटमध्ये फोनचा वापर करणं का हानिकारक?
तज्ज्ञांच्या मते, टॉयलेटमध्ये फोन वापरताना व्यक्ती बराच वेळ टॉयलेट सीटवर बसते, ज्यामुळे गुदाशयाच्या भागावर जास्त दबाव येतो. सततच्या या सवयीमुळे बद्धकोष्ठता, मूळव्याध (mobile phone) आणि गुदद्वारासंबंधीचा फिस्टुला यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

जीवनशैली ठरतेय का कारणीभूत?
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, एका वर्षात रुग्णालयामध्ये मूळव्याध आणि फिस्टुलाचे ५०० हून अधिक रुग्ण येतात. कमी पाणी पिणं, जंक फूडचं जास्त सेवन आणि शौचालयात जास्त वेळ घालवणं यांसारख्या वाईट जीवनशैलीच्या सवयी या समस्यांची मुख्य कारणं आहेत.

मूळव्याधांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त असलेल्या (mobile phone)रेडिओ फ्रिक्वेन्सी अ‍ॅब्लेशनसारख्या कमीत कमी आक्रमक प्रोसेसची डॉक्टर शिफारस करतात. या प्रक्रियेअंतर्गत, रुग्णाला त्याच दिवशी आराम मिळतो आणि रुग्णालयातून देखील लगेच डिस्चार्ज मिळू शकतो. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे फोन घेऊन जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसणं टाळावं.

हेही वाचा :

होळीनिमित्त राज्यभरातील रेशन दुकानांवर अन्नधान्सासोबत फ्री साडी वाटप सुरु

लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी फेब्रुवारीचा हप्ता येणार

कलाविश्वावर शोकाकळा! ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेते संतोष नलावडे यांचं अपघाती निधन