शेअर बाजारासंदर्भात अर्थसंकल्पात मोठी घोषणा; … गुंतवणूकदारांना मोठा झटका!
आज (ता.२३) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प(investors) सादर केला. यावेळीच्या अर्थसंकल्पात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा झटका देण्यात आला आहे. कॅपिटल गेन टॅक्सअंतर्गत, लॉन्ग टर्म कॅपिटल गेन 10 टक्क्यांवरून 12.50 टक्के करण्यात आला आहे. तर काही अँसेट्सवर शॉर्ट टर्म कैपिटल गेन टॅक्स 20 टक्के करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर अल्पावधीतच शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. दुपारी १२ वाजता मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांच्या घसरणीसह 79,224.32 अंकांपर्यंत खाली घसरला. सध्याच्या घडीला दुपारी ३ वाजता बीएसईचा सेन्सेक्स(investors) ८०,४८६ अंकांच्या पातळीवर आहे. तर ३ वाजता निफ्टी २४,५०० अंकावर असल्याचे पाहायला मिळाले.अर्थात निफ्टीने देखील या घोषणेमुळे गटांगळी खाल्ली आहे.
सकाळी शेअर बाजार सुरु होताच सरकारी कंपन्यांचे शेअर्स (पीएसयू स्टॉक्स) प्रचंड वेगाने धावताना दिसत होते. अशातच NTPC आणि BHEL या सरकारी कंपन्यांना अर्थसंकल्पात एक मोठे काम मिळाले आहे. या दोन्ही कंपन्या मिळून सुपर अल्ट्रा थर्मल पॉवर प्लांट (UMPP) उभारणार आहेत. या घोषणेमुळे या दोन्ही सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज जोरदार वाढ दिसून आली आहे.
अदानी पॉवर या कंपनीचे शेअर्स सुमारे 4 टक्क्यांनी वाढताना दिसून आले आहे. अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तर अदानी पोर्टमध्ये 1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय IRFC 1 टक्के, IREDA शेअर 2 टक्के आणि RVNL शेअर 1 टक्के वाढीसह व्यवहार करत आहेत.
हेही वाचा :
कॅप्टन्सी गमावल्यावर हार्दिक पहिल्यांदाच सूर्याला भेटला अन्…; Video Viral
मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प: काय स्वस्त, काय महाग?
मोदी ३.०च्या पहिल्याच बजेटमध्ये निराशा अर्थसंकल्पातून कोणाचा झाला स्वप्नभंग