दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, रिषभ पंतवर बंदी

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल(ipl match) खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स टीमला मोठा झटका बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंतला निलंबित करण्यात आले आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या स्लो ओव्हर-रेटमुळे ऋषभ पंतवर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्याचसोबत रिषभ पंतला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंतने आयपीएलच्या(ipl match) आचारसंहितेचे उल्लंघन केले. त्यामुळे त्याच्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. आयपीएलच्या ५६ नंबरच्या सामन्यात रिषभ पंतच्या टीमने राजस्थान रॉयल्स विरुद्ध स्लो ओव्हर रेटने बॉलिंग केली. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना ७ मे रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झाला होता.

आयपीएलच्या आचारसंहितेनुसार या सीझनमधील रिषभ पंतचा हा तिसरा गुन्हा आहे. याच कारणामुळे रिषभ पंतला ३० लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्याची बंदी घालण्यात आली. याचसोबत या टीममधील प्रभावशाली खेळाडूसह प्लेइंग ११ मधील उर्वरित सदस्यांना वैयक्तिकरित्या १२ लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या ५० टक्के यापैकी जे कमी असेल तो दंड ठोठावला जाईल.

महत्वाचे म्हणजे, आयपीएलच्या स्लो ओव्हर रेटशी संबंधित आचारसंहितेनुसार, जर एखाद्या टीमच्या कॅप्टनने आयपीएल सीझनमध्ये पहिला गुन्हा केला तर त्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो. जर त्याच कॅप्टनने आयपीएलच्या सीझनमध्ये दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटचा गुन्हा केला तर त्याला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो. जर कॅप्टनने त्याच सीझनमध्ये तिसऱ्यांदा चूक केल्यास त्याला एका सामन्यासाठी बंदी घातली जाते.

हेही वाचा :

नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा

इंग्रजांना घालवले तर मोदी काय चीज? शरद पवार यांचा सवाल

मुलगा असावा तर असा ! वाजत गाजत लावलं 80 वर्षांच्या पित्याचं लग्न