थाला चेन्नईमध्ये शेवटचा IPL सामना खेळणार?

शुक्रवारी रात्री गुजरातच्या फलंदाजांकडून ससेहोलपट झालेल्या चेन्नईसमोर(match)आज रविवारी दुपारी आपल्या घरच्या मैदानावर फॉर्मात असलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना करावा लागणार आहे. ४८ तासांच्या आत पराभूत मानसिकता झटकून गतविजेत्यांना आपला लौकिक सादर करावा लागणार आहे.

गतवर्षी आयपीएलचे पाचवे विजेतेपद मिळवणारी चेन्नई एक्स्प्रेस(match) यंदाही वेगात प्रवास करत होती; परंतु गेल्या काही सामन्यात त्यांची गाडी अडखळत आहे. परिणामी, हाकेच्या अंतरावर आलेले प्लेऑफचे स्थानक आता दूर जाताना दिसत आहे. गुणतक्त्यात १२ सामन्यांत १२ गुणांसह ते सध्या चौथ्या स्थानावर असले तरी उर्वरित दोन्ही सामने गमावले तर त्यांना बाहेरचा रस्ता स्वीकारावा लागेल. त्यांचा अखेरचा साखळी सामना बंगळूरविरुद्ध आहे. त्यामुळे ती लढाईही सोपी नसेल.

प्रमुख गोलंदाजांची अनुपलब्धता आणि सलामीवीरांचे अपयश यामुळे चेन्नई एक्स्प्रेसमधील इंधन संपल्याचे जाणवत आहे. मुस्तफिजूर रेहमान बांगलादेशकडून खेळण्यासाठी तर पथिराना दुखापतीमुळे मायदेशी परतला आहे. दीपक चहरला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्यामुळे तोही स्पर्धेतून बाद झाला आहे, अशा कात्रीत सापडलेल्या चेन्नईविरुद्ध शुक्रवारी शुभमन गिल आणि साई सुदर्शन या गुजरात संघाच्या सलामीवीरांनी वैयक्तिक शतके आणि त्यांची केलेल्या द्विशतकी भागीदारीमुळे चेन्नईच्या गोलंदाजीची दुर्दशा झाली. रुळांवरून घसरलेली ही गाडी लवकरात लवकर पुन्हा मार्गस्थ केली नाही तर चेन्नईचा प्लेऑफचे पहिले स्थानक गाठणे कठीण होणार आहे.

एकीकडे गोलंदाजीतील कमकवूतपणा स्पष्ट होत असताना चेन्नईला चिंता सलामीच्या जोडीचीही आहे. सलामीच्या जोडीत अदलाबदल केली, तरीही प्रश्न सुटलेला नाही, त्यात ऋतुराज गायकवाड बाद झाला तर अडचणी अधिकच वाढत आहेत. अजिंक्य रहाणे याचे अपयश बॅकफूटवर टाकणारे आहे, त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकांत चेन्नईला धावा करण्यापेक्षा विकेट वाचवण्यासाठी लढावे लागत आहेत.

शिवम दुबे हा चेन्नईचा हुकमी फलंदाज होता; परंतु विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्यानंतर त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ कमी झाला आहे. दुबे फिरकी गोलंदाजांवर तुफानी हल्ला करतो हे लक्षात आल्यामुळे आता तो फलंदाजीस आल्यावर वेगवान गोलंदाजांचा मारा सुरू केला जातो. त्यामुळे आता अस्तित्वाची लढाई समोर असताना रहाणेला वगळून दुसरा पर्याय करावा लागणार आहे.

जर आज, चेन्नई सुपर किंग्ज चेपॉकमध्ये राजस्थान रॉयल्सला हरवू शकला नाही. तर तो प्लेऑफसाठी पात्र ठरला नाही, तर सध्याच्या परिस्थितीत धोनी 12 मे 2024 रोजी चेन्नईमध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळताना दिसू शकतो. राजस्थान रॉयल्स आता १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, आजचा सामना जिंकला तर प्लेऑमधील त्यांचे स्थान निश्चित होणार आहे. पहिल्या दोन क्रमांकात रहाण्यावर त्यांचा भर असेल. त्यामुळे क्लॉलिफायर-१ हा सामना खेळण्याची संधी मिळेल.

यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर या राजस्थानच्या सलामीवीरांनी शतके केलेली आहेत; परंतु त्यांच्या फलंदाजीत सातत्य नसल्याचे जाणवत आहे. कर्णधार संजू सॅमसनचा फॉर्म ही राजस्थानसाठी जमेची बाजू आहे. प्लेऑफ आणि पुढचा प्रवास यासाठी त्यांना सातत्य दाखवावे लागणार आहे. राजस्थानचा गेल्या दोन सामन्यांत पराभव झाला आहे. पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळण्यासाठी त्यांना जोमाने खेळ करावा लागणार आहे.

हेही वाचा :

दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, रिषभ पंतवर बंदी3

इंग्रजांना घालवले तर मोदी काय चीज? शरद पवार यांचा सवाल

शांतिगिरी महाराज आणि छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा