मोठी गुड न्यूज! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त
ऑक्टोबर महिन्यात मौल्यवान धातू सोन्याने(Gold price) चांगलीच आघाडी घेतली. सोनं पहिल्यांदाच 80 हजारांच्याही पुढे गेल्याचं दिसून आलं. तर, चांदीने 1 लाखाचाही टप्पा गाठला. मात्र, या दोन दिवसांत सोनं आणि चांदीमध्ये काही प्रमाणात नरमाई आली आहे. यामुळे ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. चांदी आणि सोन्याच्या दरवाढीला अचानक ब्रेक लागला आहे.
मागच्या आठवड्यात सोनं 1600 रुपयांनी महाग झालं. तर या आठवड्यात सोन्याने(Gold price) 650 रुपयांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर सोन्याचा भाव कोसळला. 21 ऑक्टोबर रोजी सोनं 220 रुपयांनी वाढलं. 23 ऑक्टोबरला 430 रुपयांची त्यात वाढ झाली.तर, काल 24 ऑक्टोबररोजी सोनं 600 रुपयांनी उतरलं. आज 25 ऑक्टोबररोजी देखील घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोनं 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोनं 78,246, 23 कॅरेट 77,933, 22 कॅरेट सोनं 71,673 रुपयांवर घसरले. तर, 18 कॅरेट आता 58,685 रुपये, 14 कॅरेट सोनं 45,774 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.
हेही वाचा :
दिवाळीनंतर शनीची सरळ चाल, 2025 पर्यंत ‘या’ राशींचा सुरु होणार ‘गोल्डन टाईम
दोनदा घटस्फोटानंतर प्रसिद्ध अभिनेता तिसऱ्यांदा बोहल्यावर
दिवाळीपूर्वी टीव्हीएसचा धमाका: TVS Raider 125 लाँच, दमदार परफॉर्मन्ससह नवीन तंत्रज्ञान!