मोठी बातमी! बारावीच्या निकालाची तारीख ठरली, बोर्डाने दिली महत्वाची अपडेट
विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक(board) शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची तारीख ठरली आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी दुपारी बारावीचा निकाल जाहीर होणार, अशी माहिती बोर्डाने दिली आहे. विद्यार्थ्यांना १ वाजता निकाल ऑनलाइन पाहता येणार, असंही बोर्डाने स्पष्ट केलं आहे.
दुसरीकडे दहावीचा निकाल(board) नेमका कधी लागणार? याबाबत बोर्डाने अद्याप कुठलीही माहिती दिली नाही. दहावी-बारावीची निकाल लागण्याच्या एक दिवस आधी राज्य मंडळाकडून पत्रक प्रसिद्ध केले जाते. शिक्षण बोर्डाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर होईल.
त्यामुळे यंदा बारावीचा निकाल नेमका किती टक्के लागणार? याची आता विद्यार्थ्यांसह पालकांना उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यानंतर निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून होते.
बारावीचा निकाल ऑनलाईन कसा पाहाल?
-निकाल ऑनलाइन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना mahresult.nic.in किंवा http://hscresult.mkcl.org या वेबसाइटवर जावे लागले.
-इथे लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी बारावी निकालावर क्लिक करावे.
-त्यानंतर तिथे असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाकावा लागेल.
-तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं (उदा. आईचं नाव SONALI असेल तर तुम्हाला SON लिहावं लागेल)
-सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
-बारावीच्या निकालाची तुम्ही प्रिंट आऊट घेऊ शकता. याशिवाय तो मोबाइलमध्ये देखील सेव्ह करू शकता.
हेही वाचा :.
दक्षिणेचा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका?
दक्षिणेचा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका?
शरद पवार यांचे 5 सर्वात मोठे गौप्यस्फोट, महाराष्ट्राच्या राजकारणात…