मोठी बातमी! कोरोना लसीचे गंभीर दुष्परिणाम होतात
कोरोनाच्या (vaccine)लसीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. एस्ट्राजेनेका या कंपनीने कोरोना लसी युके न्यायालयामध्ये या लसीमुळे होणारे दुष्परिणाम स्वीकारले आहेत. कोरोनाची लस बनवणारी ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी एस्ट्राजेनेकाने आपल्या लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, हे प्रथमच मान्य केलं आहे.एस्ट्राजेनेकाने UK उच्च न्यायालयात कबूल केलंय की, कोविड-19 लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसारखे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.
दोन वर्षापूर्वी जगभरात कोरोनाने(vaccine) थैमान मांडले होते. अनेकजण कोरोनाचे बळी ठरले आहेत. लाखो लोकांनी कोरोना महामारीत जीव गमावला आहे. त्यावेळी कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लस तयार करण्यात आली होती. कोरोनापासून बचाव करण्यासाठी जगभरातील असंख्य लोकांनी ही लस घेतली आहे. भारतात देखील जवळपास दोन कोटीपेक्षा अधिक लोकांनी या लसीचे दोन डोस घेतले आहेत.
या थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोममुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात किंवा शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात. शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याने ब्रेन स्ट्रोक किंवा कार्डियाक अरेस्ट होण्याची शक्यता वाढत आहे, असं समोर आलं आहे. एस्ट्राजेनेकाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये यूके उच्च न्यायालयासमोर लसीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचे आरोप स्वीकारल्याची माहिती आजतकच्या हवाल्यानुसार मिळत आहे. परंतु यावेळी कंपनीने लसीच्या बाजूने त्यांचे युक्तिवादही मांडले आहेत. एस्ट्राजेनेका कंपनी जगभरात ही लस Covishiled आणि Vaxjaveria या नावाने विकत आहे.
कंपनीच्या कोरोना लसीविरोधात अनेक लोकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत एस्ट्राजेनेका कंपनीने तयार केलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटलंय की, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित केलेल्या या लसीचे दुष्परिणाम होऊ शकतात. ते थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसारखे असू शकतात. परंतु हे फार दुर्मिळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोरोनाची लस न मिळाल्यासही थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम होऊ शकतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर लोकांना या सिंड्रोमचा सामना करावा लागतोय. असं म्हणणं चुकीचं आहे.
ही लस कोरोनाचा सामना करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचं तपासणीमध्ये सिद्ध झालं आहे. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. रुग्णांची सुरक्षा सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. लसीचे दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ असल्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. औषधांनी आवश्यक मानकांची पूर्तता केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
‘सलाम रोहित भाई…’ मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा
‘मुसलमान सर्वाधिक कंडोमचा करतात वापर’, ओवेसींचे म्हणणे तरी काय
ऐश्वर्यासोबत लग्न झाल्यानंतरही अभिषेक विसरू शकला नाही ‘या’ अभिनेत्रीला