‘मुसलमान सर्वाधिक कंडोमचा करतात वापर’, ओवेसींचे म्हणणे तरी काय
राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक(muslims) 2024 साठी प्रचार केला. जर काँग्रेस सत्तेत आली तर देशातील संपत्ती त्या लोकांमध्ये वाटण्यात येईल, ज्यांची अधिक मुलं आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावरुन देशभरात एकच काहूर उठले. विरोधकांनी या विधानाचा खरपूस समाचार घेतला. आता AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पण पंतप्रधानावर निशाणा साधला आहे.
हैदराबाद येथील एका निवडणूक प्रचारसभेत ओवेसी(muslims) यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मोदींनी काही दिवसांपूर्वी देशातील मुसलमान हे घुसखोर असल्याचा दावा केल्याचे ओवेसी यांनी सांगितले. घुसखोर तो असतो जो विना परवानगी एखाद्या देशात घुसतो. आमचा धर्म नक्कीच वेगळा आहे. पण आम्ही तर याच देशाचे रहिवासी आहोत. हा देश आमचा आहे.
पंतप्रधान म्हणतात मुसलमान अधिक मुलं जन्माला घालतात. पण खरं तर मुसलमानांचा प्रजजन दर घसरला आहे. इतकंच नाही तर भारतात मुस्लीम पुरुष सर्वाधिक कंडोमचा वापर करतात. हे मी नाही, तर सरकारचा रिपोर्ट सागंतो, असा निशाणा ओवेसी यांनी साधला.
हिंदूमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, त्यांना घाबरवण्यासाठी भाजप आणि RSS ची माणसं अशा गोष्टी करतात, असा आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी केला. त्यांचे काम हे द्वेष वाढवणे आहे. हिंदूमध्ये भीती निर्माण करण्यात येत आहे की, देशातील मुसलमान बहुसंख्याक होतील. पण सत्य तर हे आहे की, असे कधी होणार नाही. आमचा धर्म वेगळा असला तरी आम्ही या देशाचे आहोत.
राजस्थानमधील बांसवाडा येथे निवडणूक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या एका वक्तव्याचा आधार घेतला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यानुसार देशातील संपत्तीवर पहिला अधिका मुसलमानांचा आहे, असा दावा पीएम मोदींनी केला होता. आता काँग्रेस सत्तेत आली तर लोकांची संपत्ती मुसलमानांमध्ये वाटण्यात येईल. ही शहरी नक्षल मानसिकता आई-बहिणींचे मंगळसूत्र पण सोडणार नाही, असा हल्लाबोल मोदींनी केला होता.
हेही वाचा :
मे महिन्यात ‘या’ 5 राशींचं प्रत्येक स्वप्नं होईल साकार
मानसिक आरोग्यासाठी ‘डान्स’ अत्यंत फायदेशीर, मिळतील 4 जबरदस्त फायदे
पहिल्याच तारखेपासून सुट्ट्या घेऊन येतोय मे महिना! ही घ्या सर्व सुट्ट्यांची यादी