अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा भारतीय चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रोजेक्ट्समधून पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.(important )एकीकडे फरहान अख्तरचा ‘जी ले जरा’ हा चित्रपट लांबणीवर पडल्याची चर्चा असताना, प्रियांकाने थेट एस.एस. राजामौली यांच्या आगामी चित्रपटातून मोठ्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. तसेच, ती ‘क्रिश ४’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचाही भाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रियांकानं दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू आणि दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्यासोबत हैदराबादमध्ये चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्याचे वृत्त आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘SSMB29’ या चित्रपटासाठी प्रियांकाने तब्बल ३० कोटी रुपये मानधन घेतले आहे. ही रक्कम तिला दीपिका पदुकोणला मागे टाकत सर्वाधिक मानधन घेणारी भारतीय अभिनेत्री बनवू शकते, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
यासोबतच, ‘क्रिश’ फ्रँचायझीच्या चौथ्या भागातही प्रियांका दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे. (important )२००६ साली आलेल्या ‘क्रिश’ नंतर तब्बल १९ वर्षांनी ती या सिक्वेलमध्ये दिसू शकते. या चित्रपटाची कथा ‘क्रिश ३’ नंतर १५ वर्षांनी येत असल्याने, ती एक दशक पुढे सरकलेली दिसेल. या चित्रपटात प्रियांकासोबतच रेखा आणि प्रीती झिंटा या अभिनेत्रीही पुन्हा एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे.
‘क्रिश ४’ चे दिग्दर्शन स्वतः हृतिक रोशन करणार असल्याचीही चर्चा आहे. (important )काही दिवसांपूर्वीच राकेश रोशन यांनी सांगितले होते की, हृतिकने आता नव्या पिढीच्या दृष्टिकोनातून ही फ्रँचायझी पुढे नेण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे. लेक मालतीच्या जन्मानंतर अनेक प्रोजेक्ट्सना नकार देणाऱ्या प्रियांकाने आता पुन्हा एकदा तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित केल्याचे या मोठ्या प्रोजेक्ट्सच्या चर्चांवरून दिसून येत आहे.
हेही वाचा :