बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायिका तसेच अभिनेत्री सोफी चौधरीने एक (singer)धक्कादायक खुलासा केला आहे. मुंबईतील उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या वांद्रे येथे एका महिन्यापूर्वी सोफियाला एक धक्कादायक अनुभव आला होता. त्याचीच आठवण तिने करून दिली आहे. वांद्रातील एका रस्त्यावरुन जात असताना एक व्यक्ती माझ्याकडे पाहून हस्तमैथून करत होता. अशा घटना खरोखरच ‘घृणास्पद’ आहेत, असंही अभिनेत्रीने म्हटलं आहे.’हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोफीने तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगितलं. “हा प्रकार अगदी अलिकडेच घडला आहे. साधारणपणे महिन्याभरापूर्वी वांद्रे येथे मी एका माणसाला माझ्याकडे पाहून अक्षरशः पँटची चैन उघडताना आणि ‘सर्वकाही’ दाखवताना पाहिले. मी माझ्या कारमधून तिथून जात असताना हे सारं पाहिलं,” असं सोफियाने म्हटलं आहे.

“हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आलेला असंही मला वाटत नाही. (singer)कधीकधी पुरुष हे असले प्रकार कोणतंही स्पष्टीकरण न देता करतात. मी खारच्या लेनवरून चालत असताना पुरुषांना त्यांच्या बाईक थांबवून असले प्रकार करताना मी पाहिलं आहे. करताना पाहिले आहे. अशा गोष्टी फारच घृणास्पद वाटतात,” असंही सोफियाने पुढे मत मांडताना म्हटलंय. “जगातील प्रत्येक देशात असे घडते. पहिल्यांदा कोणीतरी माझ्याकडे पाहून हस्तमैथून करताना मी लंडनमध्ये शाळेत होते तेव्हा पाहिले होते,” असं ती पुढे म्हणाली.
आपल्या समोर सेलिब्रिटी उभे आहेत या एकाच कारणाने अनेकदा चाहते मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करतात, परंतु मी माझ्या मर्यादा आखण्याबाबत अगदी स्पष्ट आहे, असंही सोफियाने यावेळेस बोलताना स्पष्टपणे सांगितलं. “सेलिब्रिटींना अनेकांना तोंड द्यावे. यापैकी एक समस्या म्हणजे लोक जवळ येतात आणि विचारतात की ते आमच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढू शकतात का. अर्थात ते फोटो काढू शकतात. (singer)पण असे फोटो काढताना ते अगदी धूर्तपणे मागून तुमच्या कंबरेवर हात ठेवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा ते तुमच्यासोबत चाहते म्हणून फोटो काढण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते अनेकदा कंबरेवर हात नेण्याचा प्रयत्न करतात,” असा दावा सोफियाने केला.
“मी आता याबद्दल फारच सतर्क असते कारण जेव्हा एखादा चाहता फोटो काढण्यासाठी विचारतो तेव्हा मी सर्वात आधी ‘हात नाही लावायचा’ असे स्पष्टपणे सांगते. माझी संपूर्ण टीम देखील अशावेळी खूप सतर्क आहे. मी याबद्दल खूप सावध आहे. कोणालाही मी माझ्या अंगावर हात ठेवण्याची परवानगी का द्यावी? मला तुमच्यासोबत आदराने फोटो काढण्यास खूप आनंद वाटतो, मात्र एक चाहता म्हणून तुम्हाला माझ्या अंगाला हात लावण्याची परवानगी मी देऊ शकत नाही.”

सोफीने मनोरंजनसृष्टीमध्ये गायिका म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. सोफियाने ‘हबीबी’, ‘ले ले मेरा दिल’ आणि ‘बेबीलव्ह’ यासारखी हीट गाणी गायली आहेत. डेव्हिड धवनच्या ‘शादी नंबर वन’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय, तिने ‘प्यार के साइड इफेक्ट्स’, ‘शूटआउट अॅट वडाळा’, ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा!’बरोबरच इतर अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.
हेही वाचा :
असं काय केलं महापाप की गर्लफ्रेंडने धावत्या बाईकवरच तरुणाला चप्पलीने दिला चोप ; Video Viral
रोहित शर्मानंतर कसोटीत भारताचं नेतृत्व कोणाकडे? ‘या’ दिवशी होणार घोषणा
सिंधू नदीचा पाणी प्रश्न चिघळला, आंदोलनाला हिंसक वळण, गृहमंत्र्यांचं घर पेटवल