सर्वात मोठी बातमी! वाल्मिक कराडची तब्येत बिघडली; आयसीयूमध्ये दाखल

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती खालावली असून, त्याला उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटात दुखू लागल्याने(health) त्याला काल (22 जानेवारी) रात्री एक वाजता रुग्णालयात आणण्यात आले. सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, आजच वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर केजच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला(health) १४ तारखेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या वकिलांनी त्याच दिवशी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज केज जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराडला न्यायालय जामीन देणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाट, विष्णू चाटे, प्रतीक घुले, महेश केदार यांचा समावेश आहे. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधळे हा महिनाभरापासून फरार असून, त्याला फरार घोषित करण्यात आले आहे.

दरम्यान, खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व इतर आरोपी सीआयडी तपासापूर्वी बीडवरून पुण्याला गेले होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, ३० डिसेंबरच्या रात्री सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून तीन आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची माहिती देणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या गाड्यांनी बीडच्या मांजरसुंबा येथील एका हॉटेलमध्ये जेवण केले आणि एका पेट्रोल पंपावर डिझेलही भरले. याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री १.३६ वाजता पास झाल्या.

पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ (MH 23 BG 2231) ही गाडी शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. हीच गाडी वाल्मिक कराड वापरत होता, जेव्हा तो पाषाण येथील सीआयडी कार्यालयात हजर झाला. याच गाड्यांमधून आरोपी फरार होण्यास मदत झाली असावी, असा कयास लावला जात आहे.

हेही वाचा :

ऑटो एक्स्पो 2025 मध्ये Eicher Pro X Range लाँच

नितीश कुमार यांचा NDA ला मोठा धक्का! ‘या’ राज्यातील सरकारचा पाठिंबा काढून घेतला

संजय राऊतांना लक्ष्य करणाऱ्या शिंदे गटाच्या घोषणेमुळे खळबळ; काळे फासणाऱ्याला 1 लाखाचे इनाम