शरद पवार गट, ठाकरेंचा गट फुटणार असल्याचा भाजप नेत्याचा दावा

राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची(leader) धामधूम सुरू असतानाच अनेक नेते आरोप प्रत्यारोप करत असतानाच भाजप नेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी मोठं वक्तव्य करत राजकारणात खळबळ उडवली आहे. कंबोज यांनी सोशल मिडीया एक्सवरती पोस्ट शेअर करत राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूंकप होणार असल्याचं भाकित वर्तवलं आहे. त्यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मोहित कंबोज यांनी आपल्या सोशल मिडीया (leader)एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, लोकसभेचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात आणखी फूट पडेल. दोन्ही पक्षांतील आमदार, नेते आणि कार्यकर्ते राजीनामा देऊन बाहेर पडतील. या पक्षांतील सर्वजण इतर पक्षांच्या संपर्कात आहेत, असा दावा देखील मोहित कंबोज यांनी केला आहे.

कंबोज यांच्या या दाव्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गट आणि शरद पवार गटातील उर्वरित आमदार उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची साथ सोडून सत्ताधारी पक्षांमध्ये सामील होणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

नाशिकच्या सभेत बोलताना उध्दव ठाकरे यांनी 5 तारखेला अर्धा भाजप पक्ष फुटल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही सगळे गद्दार जमवले आहेत, सत्ता आल्यावर सगळी यंत्रणा आमच्या हातात असेल, मग आम्ही या गद्दारांच्या शेपट्या कशा पकडतो, बघा तुम्ही, असा हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा :

‘एआय’चा फटका बसतोय प्रकाशन व्यवसायाला

कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनचे साइड इफेक्ट्स समोर…

“घरी बसलेले होते म्हणून त्यांना बॉम्बस्फोटातील आरोपी…”, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल