“घरी बसलेले होते म्हणून त्यांना बॉम्बस्फोटातील आरोपी…”, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर(home) जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाच्या रॅलीमध्ये सहभागी झालेला इक्बाल मुस्कानवरुन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना टार्गेट केलं. मुख्यमंत्री पदाच्या काळात उद्धव ठाकरे हे घरी बसलेले होते म्हणून त्यांना मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची गरज पडतेय, असं शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, युतीने या राज्यात केलेली विकासाची कामे(home) जनतेच्या मतांमधून दिसून येणार आहेत. मोदीजींनी दहा वर्षात देशाला महासत्तेकडे नेण्याचा केलेला प्रयत्न या निवडणुकीमध्ये आपल्याला कामी येणार आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं.

उद्धव ठाकरेंना उद्देशून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ते घरी बसलेले होते म्हणून मुंबई बॉम्बस्फोटमधला आरोपी इकबाल मुस्कान त्यांचा प्रचार करताना दिसतोय, हे चालेल तुम्हाला? पाकिस्तानचे झेंडे चालतील का? म्हणून याचा बदला तुम्ही २० तारखेल घ्यावा, असं आवाहन शिंदेंनी केलं.

हेही वाचा :

कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनचे साइड इफेक्ट्स समोर…

“आताही बॅगा घेऊन आलोय…”, चक्क मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी

6GB रॅम अन् 6000mAh बॅटरीसह लवकरच लाँच होणार Samsung Galaxy M35