भाजप पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग पिस्तुलाचा धाक दाखवत केला अत्याचार

नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(molested)नाशिकमधील भाजप पदाधिकाऱ्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात मध्यरात्री रोहित कुंडलवाल या भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर अवैध सावकारी, ठार मारण्याची धमकी देणे आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीला रोहित कुंडलवालने पैशाच्या व्यवहारातून त्रास देत होता. पैसे देत नसल्याने त्याने फिर्यादीच्या १५ वर्षीय मुलीला पिस्तुलाचा धाक दाखवला आणि तिच्यावर विनयभंग केला. पैशासाठी धमकी देणे आणि लोकांकडून बळजबरीने पैसे उकळणे हा रोहित कुंडलवाल आणि त्याच्या वडिलांचा उद्योग आहे.
नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आरोपी रोहित (molested)कुंडलवालला मध्यरात्री बेड्या ठोकल्या. पण त्याचे वडील कैलास कुंडलवाल अद्यापही फरार आहेत. दरम्यान पोलिसांनी रोहित कुंडलवालकडून ३ मोबाईल, आलिशान कार, पिस्तुल आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
फिर्यादीच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. रोहित कुंडलवालच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्याच्या (molested)फरार वडिलांनाही अटक व्हावी असे लोक म्हणत आहेत. दरम्यान भाजप पदाधिकाऱ्याच्या या कृत्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा :
अजितदादांचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; दोन बडे नेते राष्ट्रवादीत?
पत्नीच्या शरिराचे केले २०० तुकडे अन्…, पीडितेच्या कुटुंबाने केली धक्कादायक मागणी
‘9 वर्षे हे सगळं सुरू…’ , गोविंदाचा ‘त्या’ गोष्टीबद्दल गौप्यस्फोट!
पत्नीच्या शरिराचे केले २०० तुकडे अन्…, पीडितेच्या कुटुंबाने केली धक्कादायक मागणी