भाजपकडून पुण्यातील ‘या’ बड्या नेत्यांना पुन्हा उमेदवारी, कसा रंगणार सामना?
पुणे : पुणे शहरातील बहुतेक मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट हाेऊ लागले आहे. भाजपने त्यांच्या वाट्यातील आणखी तीन मतदारसंघातील उमेदवारांची(candidates) नावे जाहीर केली आहेत. कसब्यातून हेमंत रासने यांना पुन्हा संधी दिली आहे, खडकवासला आणि पुणे कॅन्टाेन्मेटमधून अनुक्रमे विद्यमान आमदार भीमराव तापकीर आणि सुनील कांबळे यांची नावे निश्चित झाली आहेत.
भाजपच्या पहील्या यादीत पुणे शहरातील तीन मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले गेले हाेते. यामध्ये माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, सिद्धार्थ शिराेळे या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली. परंतु कसबा, खडकवासला, पुणे कॅन्टाेन्मेट मतदारसंघातील उमेदवारांची नावे कधी जाहीर हाेणार याकडे लक्ष लागले हाेते. अपेक्षेनुसार भाजपकडून तापकीर, कांबळे या दाेन्ही विद्यमान आमदारांना संधी दिली आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीविषयी(candidates) रासने आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यात चुरस निर्माण झाली हाेती. यासाठी पक्षाकडून काही सर्व्हेक्षण केले गेले हाेते. रासने यांनी पाेटनिवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा जाेमाने काम सुरु केले हाेते. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील काही नगरसेवकांनी तापकीर यांच्या उमेदवारीला विराेध केला हाेता. यामुळे पक्षातंर्गत राजकारण तापले हाेते. तापकीर यांनी मुंबईत तळ ठाेकून उमेदवारी खेचून आणली आहे. तर पुणे कॅन्टाेन्मेंट मतदारसंघ हा राखीव असल्याने भाजपकडे विद्यमान आमदार कांबळे यांच्याशिवाय सक्षम पर्याय नव्हता. त्यांचे नावही यादीत जाहीर झाले आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. कसबा पेठेतून मविआचे उमेदवार म्हणून रविंद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पोटनिवडणुकीत पराभव केला होता. आता त्याच मतदारसंघात काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना तर भाजपकडून पुन्हा एकदा हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केल्यानं कसब्यात पुन्हा रविंद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी लढत पाहायला मिळेल.
महायुतीत भाजप 153 जागा लढवणार असल्याची चर्चा असल्यानं भाजपकडून अजून 32 विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करु शकते. भाजपनं पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली होती. दुसऱ्या यादीतदेखील बऱ्याच विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा :
2025 मध्ये ‘या’ 4 राशींना शनी बनवणार धनवान
मोठी बातमी! आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार नाही, कारण…
BSNL चा खास प्लॅन, किंमत 800 रुपयांपेक्षा कमी, 300 दिवसांसाठी रिचार्जचं नो टेन्शन