महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम जनतेच्या मतांनीच भाजप प्रदेशाध्यक्ष यांचे विधान

महाराष्ट्र विधानसभेत भाजप-महायुतीला चांगले यश मिळाले आहे. त्यावरच (voters)आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान केलं आहे. ‘महायुती सरकार उत्तम काम करू शकते हा विश्वास असल्यानेच महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेने मते दिली आहेत. महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर अविश्वास दाखवून मतदारांचा अपमान केला जात आहे’, अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

लोकसभेच्या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन केले, त्यातून शिकलो व पुढे गेलो आणि जिंकलो. जनतेने डबल इंजिन सरकारला मते दिली आहेत. जनतेने महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. तसेच 440 व्होल्टचा करंटही दिला आहे, असाही टोला त्यांनी लगावला. नागपूरच्या कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात बावनकुळे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

तसेच नांदेडच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला, त्या ठिकाणी ईव्हीएम चांगली होती का? असा प्रश्नही बावनकुळे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, (voters)महाराष्ट्रातील मतदारांनी महायुती सरकारच्या योजनांना मत दिले आहे. आमचे सरकार उत्तम काम करू शकते, असा जनतेचा विश्वास आहे, म्हणूनच हा जनादेश मिळाला आहे. लोकसभेत महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले, तेव्हा ईव्हीएम चांगली होती. सध्या महाविकासवाल्यांना झोप लागत नाही. त्यांना जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते शांत होतील.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या लोकांनी तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा आपली मते का कमी झाली याचे चिंतन करावे, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला. तीन पक्षांचे सरकार(voters) बनवताना थोडा वेळ लागतोच, मंत्रिपद कसे वाटायचे, कोणाला कोणते खाते द्यायचे, पालकमंत्री कुठे, कोण असेल? हे सर्व सूत्र तयार करून सरकार तयार होते.

हेही वाचा :

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण

मोठी बातमी! कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी

आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; 5 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा

डॉक्टरांनी सुचवलेली 7 जादुई फळं फक्त 20 रुपयांत हाडांना बनवा लोखंडासारखी मजबूत