यवतमाळमध्ये काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार उघड; मजुरांच्या खात्यातून 100 कोटींची उलाढाल, पोलिसांचा सहभाग

यवतमाळ मधून काळापैसा पांढरा करण्याचा प्रकार समोर आला आहे. तीन महिन्यात १०० कोटीहून अधिक उलाढाल(light) झाल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणात पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यवतमाळ मधून काळापैसा पांढरा करण्याचा प्रकार समोर आला आहे. यवतमाळमधील अनेक मजुरांच्या(light) खात्याचा वापर करून तीन महिन्यात १०० कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा पैसा आयपीएलमधील असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
काळा पैसे पांढरा करण्यासाठी यवतमाळमधील अनेक मजुरांच्या खात्याचा वापर करण्यात आलं असून त्यामार्फत तीन महिन्यात १०० कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा पैसे आयपीएलमधील असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात यवतमाळमधील पांढरकवडा पोलीस (light)ठाण्यातील सहाय्यक पोलीसनिरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. श्रीकांत करलावर आणि श्रीधर चव्हाण यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना यवतमाळच्या पांढरकवडा येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये घडली आहे. गावात रोज मजुरी करून पोट भरणाऱ्या मजुरांच्या नावाने बँकेत खाते उघडून त्यात मार्च ते जून २०२५ या तीन महिन्यात तब्बल १०० कोटींच्या घरात उलाढाल झाल्याचं दिसून आलं आहे.

पांढरकवडा तालुक्यातील चोपण, वाघोली, वसंतनगर, दहेली तांडा या अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या तक्रारीनुसार, मयूर चव्हाण याने अनेकांची आधारकार्ड आणि विविध कागदपत्रं घेतली होती. त्यानंतर गावातील किरण राठोड याच्या खात्यात एक कोटी 16 लाख रुपये आले. काही वेळातच ही रक्कम दुसऱ्या खात्यात वळती झाल्याची माहिती मिळाली. हा प्रकार माजी नगराध्यक्ष संतोष बोरेले यांना समजतात त्यांनी बँकेकडे विचारणा केली. त्यानंतर असाच प्रकार शेकडो खात्यांमध्ये झाला असल्याचा प्रकार समोर आला. पांढरकवडा पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दिली. मात्र पोलिसही कारवाई करीत नसल्याचा आरोप संतोष बोरेल यांनी केला.

पांढरकवडा माजी नगराध्यक्ष काय म्हणाले?
या प्रकरणी पांढरकवड्याचे माजी नगराध्यक्ष संतोष बोरले म्हणाले की, “चंद्रपूरच्या एका व्यक्तीने काही मुलांना हाताशी धरून त्यांच्या नावाने अकाउंट उघडून घेतले. त्या बदल्यात काम देतो असं आश्वासन त्याने दिलं होतं. अकाउंट खुले झाल्यानंतर एक ते दीड कोटी प्रत्येकाच्या अकाउंटवर जमा झाले आणि परस्पर पैसे काढण्यात आल्याचं समोर आलं. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये हा प्रकार घडला. त्यानंतर अधिकचा तपास केला असता अशा प्रकारची कोट्यवधी रक्कम अनेकांच्या नावावर काढण्यात आल्याचं समोर आलं.”

ज्या विद्यार्थ्यांच्या नावावर अकाउंट काढण्यात आलं होतं त्यांच्यावर आता सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आलं आहे. या क्रिकेट, लँड माफिया, खाणींचा पैशाचे व्यवहार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत अशी माहिती संतोष बराले म्हणाले

हेही वाचा :