हरियाणातील यमुनानगर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.(boss ) प्रोमोशन मिळवण्यासाठी पतीने आपल्या पत्नीवर बॉससोबत लैंगिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तिने नकार दिल्यानंतर तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यात आला आणि तिला घराबाहेर काढण्यात आले.याशिवाय सासरच्या मंडळींनी तिच्यावर सतत हुंड्यासाठी दबाव टाकल्याचेही तिने म्हटले आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
महिलेने ९ डिसेंबर २०२० रोजी अरुण शर्मा नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. तिच्या पालकांनी लग्नात सुमारे ६ ते ७ लाख रुपये खर्च केले होते आणि (boss )अनेक सोन्या-चांदीचे दागिने दिले होते, जे तिच्या सासरच्यांनी ठेवून घेतले. लग्नानंतर लगेचच, पती आणि सासरच्या लोकांनी अधिक हुंड्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि गाडीची मागणीही केली.
यानंतर सासरच्या मंडळींकडून छळ सुरू झाला. महिलेनं पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तिच्या पतीने तिला ऑफिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले, जे तिने नाकारले. त्यामुळे तिला मारहाण करून घराबाहेर काढण्यात आले. तिच्या एक वर्षाच्या मुलगा (boss )आणि अडीच वर्षांच्या मुलीला देखील तिच्याकडून हिरावून घेण्यात आले.
या घटनेनंतर तिने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच पती आणि सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी पतीविरुद्ध हुंड्यासाठी छळ, मारहाण, मानसिक छळ आणि गुन्हेगारी धमकी यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :