“बॉलिवूड सुंदरीनं उघड केली भावना: ‘शुभमन गिलला डेट करायचं आहे!

टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलची सोशल मीडियावर जबरदस्त (fast follow)फॅन फॉलोइंग असून प्रत्येक मुलगी त्याची चाहती आहे. जबरदस्त फलंदाजी करत शुभमनने प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलंय. शुभमनचं फॅन फॉलोविंग वाढल्यापासून अनेक सुंदरींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं आहे. मात्र, शुभमनने त्याबद्दल कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. अशातच आता एका तेलुगू अभिनेत्रीनेसुद्धा शुभमनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काय म्हणाली ही अभिनेत्री? जाणून घेऊया.

सुप्रसिद्ध तेलुगू अभिनेत्री प्रज्ञा जयस्वालने एका चॅट शोमध्ये खुलेपणानं सांगितलं की, ती शुभमनला डेट करू शकते कारण, तो खूप क्युट आहे. प्रज्ञा म्हणाली की, ती आता सिंगल(fast follow)आहे आणि तिला कोणत्याही क्रिकेटरला डेट करायला काहीच हरकत नाही आणि जर गिल असेल तर खूप छान आहे, नशिबात लिहिलं असेल तर नक्कीच होईल.

प्रज्ञा जयस्वालचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर शुभमनचं नाव यापूर्वी सारा अली खान, सारा तेंडुलकर आणि अनन्या पांडे यांसारख्या स्टार्ससोबत जोडलं गेलं होतं. सारा तेंडुलकर आणि शुभमन यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, शुभमन आणि साराने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

प्रज्ञा जयस्वालने दक्षिणेतील फिल्मफेअर पुरस्कार आणि दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे. प्रज्ञाने २०१४ मध्ये तामिळ भाषेतील (fast follow)चित्रपट ‘विराट्टू’ या सिनेमातून अभिनयाची सुरुवात केली परंतु तिला ‘कांचे’ २०१५ या सिनेमामुळे प्रसिद्धी मिळाली. ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण साउथचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. ‘टीटू एमबीए’ या सिनेमातून प्रद्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नक्षत्रम २०१७, आचारी अमेरिका यात्रा २०१८ आणि अखंड २०२१ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा :

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण

मोठी बातमी! कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी

आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; 5 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा