BSNL चे नवे रिचार्ज प्लॅन्स; कमी किमतीत जास्त वैधतेचा लाभ!

तुम्ही स्वस्त आणि मस्त(recharge) रिचार्ज प्लॅनच्या शोधात आहात का? असं असेल तर BSNL ने देखील तुमच्यासाठी दोन खास प्लॅन्स आणले आहेत. तुम्ही नवीन वर्षात हे प्लॅन्स घेऊ शकतात. BSNL ने दीर्घ वैधतेचे दोन नवे प्री-पेड प्लॅन लॉन्च केले आहेत, याविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

टेलिकॉमटॉकच्या रिपोर्टनुसार, BSNL ने आपल्या प्रीपेड रिचार्ज (recharge)प्लॅनमध्ये दोन नवीन पर्याय जोडले आहेत. एक प्लॅन 251 रुपयांचा तर दुसरा 628 रुपयांचा आहे.
BSNL चा 215 रुपयांच्या या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिल्ली आणि मुंबईच्या MTNL नेटवर्कवर कॉलिंगसह अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग मिळते. याशिवाय या प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा मिळतो. विहित डेटा मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर इंटरनेटचा वेग 40kbps पर्यंत मर्यादित असतो. तसेच युजर्संना रोज 100 फ्री SMS देखील मिळतात.
Zing म्युझिक, WOW ENTERTAINMENT व्हिडिओ स्ट्रीमिंग अॅप, BSNL Tunes, Astrotell, Gameium, GameOn, Challenger Arena गेम्स, Lystn पॉडकास्ट आणि Hardy गेम्सचे सब्सक्रिप्शन यासारख्या काही अतिरिक्त सेवाही या प्लॅनमध्ये समाविष्ट आहेत.
BSNL च्या 628 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग आणि रोज 100 फ्री SMS मिळतात, 215 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच डेटाच्या बाबतीत हा प्लॅन सर्वोत्तम असला तरी यात रोज 3GB डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर फेअर युसेज पॉलिसी (FUP) लागू होते आणि इंटरनेटस्पीड 40kbps पर्यंत मर्यादित असतो, परंतु युजर्स अमर्यादित इंटरनेटचा आनंद घेऊ शकतात.
याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात 70 दिवसांची वैधता मिळते. होय, तुम्ही बरोबर वाचलंत. सरकारी कंपनी 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 70 दिवसांची वैधता देते. मात्र, इथे तुम्हाला आधी एक अट समजून घ्यावी लागेल. प्लॅनमध्ये मिळणारे फायदे मर्यादित काळासाठी वापरता येतील.
BSNL च्या 197 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज पॅकमध्ये 70 दिवसांच्या बेसिक वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 2GB डेटा मिळतो, परंतु हे फायदे फक्त पहिल्या 18 दिवसांसाठी उपलब्ध आहेत.
हेही वाचा :
“ICC रँकिंगमध्ये बुमराहचा पराक्रम; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर!
मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; फरार आरोपींना अटक न झाल्यास मराठे रस्त्यावर उतरणार
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा!