iPhone 16 वर रिलायन्सकडून बंपर ऑफर; मिळणार तब्बल ‘इतक्या’ हजारांचं डिस्काऊंट

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आयफोन घेऊ इच्छणाऱ्यांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. आयफोन 16 सप्टेंबर महिन्यात लॉन्च(launch) झाला. हा फोन येताच त्याच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. आयफोन अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई शॉपिंगच्या वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध आहे.

याचबरोबर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स डिजिटलवर देखील आयफोन 16 उपलब्ध आहे. रिलायन्सने या फोनवर एक धमाकेदार ऑफर आणली आहे. या ठिकाणी बँक डिस्काऊंटसोबत नो कॉस्ट ईएमआयसुद्धा मिळत आहे. अॅपलच्या या सर्वात लेटेस्ट फोनवर रिलायन्स नेमकी काय ऑफर देत आहे, ते जाणून घेऊयात.

आयफोन 16 च्या 128GB व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये आहे. त्यावर रिलायन्स डिजिटलमध्ये पाच हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे(launch). रिलायन्स डिजिटलवर तुम्ही आयफोन घेण्यासाठी आयसीआयसीआय किंवा कोटक बँकेच्या कार्डचा वापर केला तर तुम्हाला पाच हजाराचे इंस्टेंट डिस्काऊंट मिळणार आहे.

या ऑफरमुळे आयफोनची किंमत ही 74,900 होणार आहे. त्यानंतर ‘नो कास्ट’ ईएमआयचीसुद्धा ऑफर दिली जाणार आहे. ही ऑफर सहा महिन्यांसाठी घेतली तर प्रत्येक महिन्याला 12,483 रुपये देऊन आयफोन घेता येईल. म्हणजेच तुम्हाला पहिल्यांदा फक्त 12,483 रुपये भरावे लागतील.

आयफोन 16 मध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत. यामध्ये A18 चिप दिली गेली आहे. या चिपमुळे फोनच्या वेगात लक्षणीय सुधारणा झाली आहे. याचबरोबर बॅटरी देखील अधिक वेळ चालणार आहे. एकाच वेळी गेम खेळणे, फोटो घेणे अशी अनेक कामे यात करता येतील. यामध्ये फोटोसाठी उत्तम कॅमेरा देखील आहे.

हेही वाचा :

‘त्याच्या’ गालाला गाल लावल्यानंतर शाहरुखने स्टेजवरच अभिनेत्रीच्या साडीचा पदर पकडून…

ब्लॉकबस्टर ऑक्टोबर, वर्ल्ड कप खेळणार टीम इंडिया, पाकिस्तानसोबत होणार मुकाबला

लहानग्याने टीव्ही सुरु करण्याचा प्रयत्न केला अन् तोच अंगाशी आला; शॉक लागून क्षणात झाला मृत्यू