इलेक्टोरल बाँडबाबत पीएम मोदी काय म्हणाले?
“आम्ही भाजपमध्ये चेकने पैसे घेणार असं ठरवलं होतं. व्यापारी लोक आम्हाला म्हणू लागले चेकने पैसे देणार नाही. आम्ही चेकने पैसे दिले तर सरकार पाहाणार, ते आम्हाला त्रास देतील. मग ते म्हणाले पैसे द्यायला तर तयार आहोत पण चेकने देणार आहोत. इलेक्टोरल बाँड नसते तर कोणत्या व्यवस्थेत ताकद आहे की, पैसा कोठून कोणाकडे गेला ही माहिती काढायची? ही तर इलेक्ट्रोल बाँडची सक्सेस स्टोरी आहे. इलेक्टोरल बाँड आहेत , त्यामुळे तुम्हाला समजतय की, कोणत्या कंपनीने कोणाला पैसे दिले आहेत. आता यामध्ये चांगले झाले की, वाईट झाले हा वादाचा विषय असू शकेल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेला पंतप्रधान मोदींनी मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.
निवडणुकीत काळा पैसा खतरनाक खेळ असतो
नरेंद्र मोदी म्हणाले, निवडणुकीत काळा पैसा खतरनाक खेळ असतोय. देशातील निवडणुकांना काळ्या पैशापासून मुक्ती मिळावी, अशी चर्चा देशात मोठ्या कालावधीपासून चर्चा सुरु आहे. निवडणुकांमध्ये खर्च होत असतोच. कोणीच नाकारणार नाही. माझा पक्षही करतो आणि इतर पक्षही करतात. पैसे लोकांकडून घ्यावे लागतात. सगळे पक्ष घेतात. मला वाटत होतं की आम्ही काही प्रयत्न करु की, काळ्या पैशापासून देशाला मुक्ती मिळेल. आम्ही हजार आणि दोन हजारांच्या नोटा बंद केल्या. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की, 20 हजार रुपयांपर्यंत पक्ष कॅश घेऊ शकतात. मी कायदा करुन 20 हजारांची अडीच हजार करुन टाकली, असंही मोदी यांनी सांगितले.
राम मंदिराचा राजकीय मुद्दा कोणी बनवला?
पुढे बोलताना मोदी म्हणाले, राम मंदिराचा राजकीय मुद्दा कोणी बनवला? आमच्या पक्षाचा जन्मही झाला नव्हता, तेव्हा हा मुद्दा संपवता आला असता. व्होट बँकेच्या राजकारणामुळे तो मुद्दा नेहमी तापवण्यात आला. संविधान सभेत जे लोक होते ते काँग्रेसच्या विचारांची लोक होते. काँग्रेसच्या विचारधारेचे लोक होते. संविधानाच्या प्रत्येक पानावर जे पेटिंग आहे, ती सनातन धर्माची निगडीत आहे. माझा प्रयत्न हा होता की, जी 20 ज्यामुळे जन्माला आला, त्याच्यापासून मागे हटायचं नाही. मी दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात डिल्केरेशन केलं. सिल्क रुटची चर्चा आपण ऐकत आलो आहोत, असेही मोदी यांनी सांगितले.