कांद्यावरील निर्यातबंदी उठवा, केंद्राच्या कांदा खरेदी याेजनेला शेतक-यांचा विराेध

नाफेड (NAFED), एनसीसीएफ या दाेन संस्थांच्या माध्यमातून ५ लाख टन उन्हाळ कांदा(onions) खरेदी करणार आहे. ही कांदा खरेदी थेट बाजार समितीतून होत नसल्याने शेतकऱ्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. त्याबाबतची माहिती भारत दिघोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना) यांनी दिली.

भारत दिघोळे म्हणाले केंद्र सरकार बफर स्टाॅकसाठी ५ लाख टन कांदा खरेदी करणार आहे. – मात्र यावेळी कांदा(onions) दराबाबत मौन बाळगण्यात आले आहे. यंदापासून पैसे थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पोर्टलद्वारे नोंदणी करावी लागणार आहे.

दरम्यान नाफेड, एनसीसीएफ मार्फत केली जाणारी कांदा खरेदी थेट बाजार समितीतून हाेणे गरजेचे आहे. ती होत नसल्याने शेतकऱ्यांनी निर्णयास तीव्र विरोध दर्शविला आहे असे दिघाेळेंनी नमूद केले.

उन्हाळ कांदा खरेदी करण्याऐवजी केंद्रानं कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केंद्र सरकारला केली आहे.

हेही वाचा :

काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली, बड्या नेत्यांना तातडीने बोलवले…

60 हजारांमध्ये खरेदी करता येणार इलेक्ट्रिक स्कटूर; ‘ही’ कंपनी देतेय मोठा डिस्काउंट!

..अन् मैदानात रोहित शर्माची पॅण्टच सरकली! CSK vs MI सामन्यातील ‘तो’ Video व्हायरल