पोतं उचलायला म्हणून नेले अन् कोयत्याने वार केले; धक्कादायक प्रकार
पुणे : घराच्या समोर राहणार्या तरुणाने २२ वर्षीय मित्र असलेल्या तरुणाला(young) दादा पोतं उचलायचे आहे म्हणून घरातून बाहेर नेले. आणि नंतर त्याच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, याघटनेने परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून, पोलीस ठाण्यात मयत तरुणाच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. उत्तमनगर भागात ही घटना घडली आहे.
जयदीप ज्ञानेश्वर भोंडेकर (वय २२, रा. गुजर कॉम्प्लेक्स, मासे आळी, उत्तमनगर) असे या तरुणाचे(young) नाव आहे. तर, अमित सुदाम गुजर (वय २१, रा. सदर) याला अटक केली आहे. याप्रकरणी जयदीपची आई लक्ष्मी भोंडेकर (वय ४२) यांनी उत्तमनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जयदीप रविवारी दुपारी घरात झोपलेला होता. तेव्हा अमित त्याच्या घरी आला, त्याने ‘दादा पोतं उचलायला जायचे आहे माझ्या सोबत चल’ असे म्हणला. तो जयदीपला घराबाहेर घेऊन गेला. नंतर १५ ते २० मिनिटांनी भोंडेकर यांच्या घराबाहेर लोकांचा ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा जयदीपच्या डोक्यात कोयता मारल्याचे दिसून आले.
लगेच लक्ष्मी भोंडेकर या जयदीपच्या मित्रांसोबत जुनी मासे आळीतील त्याच्या घराजवळ गेल्या. जयदीप हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या डोक्यात कोयता अडकला होता. जयदीपला तत्काळ खासगी रुग्णालयात नेले.
दरम्यान, जयदीपच्या डोक्यात अमितने कोयता मारल्याचे त्याच्या आईला सांगितले. जयदीपवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना, सोमवारी (दि. 8) सकाळी त्याचा मृत्यू झाला. अमित गुजर याने नेमका खून कशासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक मोहन खंदारे यांनी दिली.
हेही वाचा:
राहुल गांधीसोबत दिसणारी ‘ती’ महिला कोण? फोटो होतोय व्हायरल
अजित पवारांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा: अमित शाहांसमोर ‘बिहार पॅटर्न’चा प्रस्ताव
एक्सपायरी डेट नंतरच्या खाद्यपदार्थांचे आरोग्यावर परिणाम: तज्ज्ञांचे सल्ले