जरांगेंच्या रडारवर चंद्रकांतदादा पाटील, आता बघतोच कसा आमदार होतोय…

आम्ही कधीही भाजपच्या विरोधात नव्हतो. भाजपचे 106 आमदार(mla citations) गेल्यावेळी निवडून दिले होते. पण, राज्यात मोदींच्या चार ते पाच नेत्यांमध्ये मराठा द्वेष भरलेला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार प्रचाराला येण्याची वाईट वेळ आली आहे, असं विधान मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी केलं आहे. ते बीडमध्ये एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

“जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आम्ही कधीच ओबीसींच्या(mla citations) विरोधात आम्ही नव्हतो. असं असते, तर गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे , प्रीतम मुंडे यांना निवडून दिलं नसतं. तुम्ही जाणूनबुजून वाटेला जात असाल, तर मराठा तुम्हाला सहकार्य करणार कसा?” असा सवाल जरांगे-पाटलांनी उपस्थित केला आहे.

“मी महायुती किंवा महाविकास आघाडीला निवडून द्यावं, असं बोललो नाही. सगेसोयरे आणि ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं असलेल्यांना सहकार्य करा. मराठ्यांच्या एकीची आणि मतांची भीती वाटली पाहिजे. आम्ही कुणाचंही काहीही केलं नसून, आम्हाला जातीयवादी ठरवलं जातंय,” अशी खंत मनोज जरांगे-पाटलांनी व्यक्त केली.

“मी चंद्रकांत पाटील यांच्या वाटेला गेलो होतो का? मी आरक्षणाबाबत गैरसमज पसरवतोय, असं चंद्रकांत पाटील यांचं मत आहे. पण, एवढ्या मोठ्या नेत्याला आपण काय बोलतो, हे समजलं पाहिजे. मी कधी माझ्यासाठी आरक्षण मागितलं आहे? माझ्या वाटेला जाण्याची काही चंद्रकांत पाटलांना गरज काय आहे? पाटील तेरे नाम नाही, तर काय आहेत. नदीतील खेकड्यावाणी भांग पाडतात. ते मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेत. कोल्हापुरात 67 मतदार तरी मागे आहेत का? आता बघतोच, कसा आमदार होतो,” असा एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटलांनी चंद्रकांत पाटलांना आव्हान दिलं आहे.

“मराठा समाज सगळ्यात मोठा आहे. तरी पंतप्रधान मोदी मराठा समाज्याच्या विरोधात बोलतात. ओबीसींना आयोगानं आरक्षण दिलंय. पण, आमच्याकडे नोंदी आहेत. आमच्यासारखं ओरिजनल आरक्षण कुणाचंच नाही. तुम्ही मराठा, पटेल, गुर्जर, जाट, यादव जाती संपवायला निघाला आहात का?” असा संतप्त सवाल जरांगे-पाटलांनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे.

हेही वाचा :

जबरदस्त फीचरसह क्‍यू३ आणि ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक बोल्‍ड एडिशन लाँच

मी गॅरंटी देतो.. सलमानच्या लग्नाबाबत मिथुन चक्रवर्ती यांची प्रतिक्रिया

काँग्रेसला राम मंदिराच्या जागी पुन्हा मशीद बांधायचीय; भाजप नेत्याचं खळबळजनक विधान