छोटा पुढारी झळकणार ‘या’ चित्रपटामध्ये! ‘या’ बड्या नेत्याच्या बायोपिकमध्ये दिसणार
बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरवडेने चांगलाच धुराळा घातलेला पाहायला मिळाला आहे. मात्र आता घनश्याम दरवडे घराबाहेर पडताच एका चित्रपटात(new movie) झळकणार आहे. त्यामुळे आता घनश्यामचे चाहते देखील प्रचंड खुश आले आहेत.
उद्या बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. मात्र त्याआधीच घनश्याम एका मोठ्या चित्रपटात झळकणार असल्याने त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. यावेळी छोटा पुढारी चित्रपटाच्या(new movie) माध्यमातून एका नेत्याच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. कर्मयोगी आबासाहेब असं या चित्रपटाचं नाव असणार आहे.
घनश्यामचा हा नवा सिनेमा 25 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो अनिकेत विश्वासरावची प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत जगभरातील संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटात वारकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन सांगोला मतदारसंघातून तब्बल 11 वेळा निवडून आलेले आमदार गणपतराव देशमुख यांच्या आयुष्यावर हा चित्रपट असणार आहे.
आमदार गणपतराव देशमुख यांच्या बायोपीकमध्ये घनश्यामची भूमिका चर्चेचा विषय ठरणार आहे. तसेच या चित्रपटात आमदार गणपतराव देशमुख यांचा जीवनपट दाखवण्यात येणार आहे. आमदार गणपतराव देशमुख हे सांगोला मतदारसंघातून तब्बल 11 वेळा निवडून आलेले एकमेव आमदार होते. तसेच त्यांनी वयाच्या 55 वर्षे सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देखील केले आहे.
आमदार गणपतराव देशमुख यांची आपल्या कार्यकाळात राज्यातील राजकारण आणि समाजकारणात देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अल्ताफ दादासाहेब शेख यांनी केले आहे. तर मायका माऊली फिल्म प्रोडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने याची निर्मिती करणार आहे.
हेही वाचा :
अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची हत्या; भायखळ्यात नेमकं घडलंय काय?
‘दो पत्ती’ चित्रपटात शाहीर शेख करणार अभिनेत्री क्रिती सेनॉनसह रोमान्स!
माजी क्रिकेटपटूच्या आईची आत्महत्या? गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह