सीएनजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात(stock market) मोठ्या प्रमाणात घसरण सुरु आहे. अशातच काही कंपन्यांचे शेअर हे मोठ्या प्रमाणात धाराशाही झाल्याचे दिसून येत आहे. यात प्रामुख्याने शेअर बाजारात सूचिबद्ध सिटी गॅस पुरवठा करणाऱ्या सीएनजी-पीएनजी कंपन्यांचे शेअर्स चांगलेच घसरले आहेत. इंद्रप्रस्थ गॅस, महानगर गॅस आणि गुजरात गॅसचे शेअर्समध्ये १८ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
संबंधित गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये(stock market) घसरण होण्याचे प्रमुख कारण हे सरकारने या कंपन्यांना प्राधान्याने दिलेला गॅस सलग दुसऱ्या महिन्यात 20 टक्क्यांनी कमी केला आहे. एकीकडे यामुळे या कंपन्यांच्या खर्चात प्रचंड वाढ होणार आहे. तर दुसरीकडे लवकरच या कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांवर बोजा टाकावा लागणार आहे. ब्रोकरेज हाऊस सिटीच्या म्हणण्यानुसार, सिटी गॅस कंपन्यांना सीएनजीच्या किमतीत १० टक्के किंवा प्रति किलो ७ रुपयांनी वाढ करावी लागणार आहे.
आज (ता.१८) सोमवारी शेअर बाजार उघडताच इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड या गॅस कंपनीचा स्टॉक जवळपास 20 टक्क्यांनी घसरून 324.70 रुपयांवर आला. जो पहिल्या सत्रात 405.80 रुपयांवर बंद झाला होता. सध्या हा शेअर 18.63 टक्क्यांच्या घसरणीसह 330.45 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे महानगर गॅस कंपनीचा शेअर देखील 18.08 टक्क्यांनी घसरून, 1075.25 रुपयांवर आला आहे.
दरम्यान, सध्या महानगर गॅसचा हिस्सा 13.75 टक्क्यांच्या घसरणीसह 1132.10 रुपयांवर व्यवहार करत आहे. गुजरात गॅसचे शेअर्स देखील 9 टक्क्यांनी घसरून, 442.50 रुपयांपर्यंत खाली आले आहे. सध्या गुजरात गॅसचा शेअर 6.18 टक्क्यांच्या घसरणीसह 455.95 रुपयांवर व्यवहार करत आहे.
सरकारने 16 नोव्हेंबर 2024 पासून शहर गॅस वितरण कंपन्यांना प्राधान्याने दिल्या जाणाऱ्या गॅसचे प्रमाण 20 टक्क्यांनी कमी केले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या धोरण मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सीएनजी आणि घरगुती पीएनजी गॅसचा समावेश असलेल्या शहर गॅस वितरणाच्या प्राधान्य विभागांना एपीएमवर घरगुती नैसर्गिक वायूचे वाटप करण्याची तरतूद आहे.
दरम्यान, स्टॉक एक्स्चेंजमध्ये नियामक फाइलिंगमध्ये, इंद्रप्रस्थ गॅसने सांगितले की, 16 नोव्हेंबर 2024 पासून सीएनजी (वाहतूक) साठी गॅसचे वाटप पूर्वीच्या एपीएम वाटपाच्या तुलनेत 20 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. ही मोठी कपात असून त्याचा परिणाम कंपनीच्या नफ्यावरही होऊ शकतो, असे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा :
मुख्यमंत्र्यांनी 74 कोटीचा घोटाळा केला; कोणी केला आरोप?
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार? उद्धव ठाकरेंनी दिलं आश्वासन, म्हणाले हे षडयंत्र…
हॉस्पिटलच्या वॉशरूममध्येच महिलांचे व्हिडिओ बनवत होता ‘तो’; जेव्हा कारनामा समोर आला तेव्हा मात्र…