काँग्रेसचं 13 राज्यांत ‘एकटा जीव सदाशिव!’
2024 लोकसभा निवडणुकीत काहीही करून भाजपला(congress) ‘400 पार’ काय बहुमताच्या जवळही जाऊ द्यायचं नाही हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसनंही भाजप पाठोपाठ 13 राज्यांत स्वबळाचा नारा दिला आहे. या 13 राज्यांतील सर्वच्या सर्व म्हणजे 89 जागांवर काँग्रेसनं आपल्या हाताच्या चिन्हावर उमेदवार उतरवले आहेत.
2024 च्या निवडणुकीत भाजपला चारी मुंडया चीत करण्यासाठी काँग्रेससह(congress) ‘इंडिया’ आघाडीनं कंबर कसली आहे. नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ नये यासाठी काँग्रेसनं तब्बल 13 राज्यांत स्वपक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.
काँग्रेसनं या 13 राज्यांत सर्व जागांवर उभे केले उमेदवार
(कंसाबाहेर राज्य व एकूण जागा, कंसात 2019 मध्ये लढलेल्या जागा)
कर्नाटक – 28 – (21)
तेलंगणा – 17 – (17)
पंजाब – 13 – (13)
छत्तीसगड – 11 – (11)
उत्तराखंड – 05 – (5)
हिमाचल प्रदेश – 04 – (04)
अरुणाचल प्रदेश – 02 – (02)
गोवा – 02 – (02)
मेघालय – 02- (02)
मणिपूर – 02 – (02)
नागालँड – 01 – (01)
सिक्कीम – 01 – (01)
मिझोराम – 01 – (01)
2019 मध्ये काँग्रेसला या 13 राज्यांपैकी एकाही राज्यात सर्वच्या सर्व जागा जिंकता आल्या नाहीत. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसनं कर्नाटक वगळता तेलंगणा, पंजाब, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, मेघालय, मणिपूर, नागालँड, सिक्कीम आणि मिझोराम या 12 राज्यांत सर्वच्या सर्व जागा लढवल्या होत्या. मात्र, त्या सर्व जागा काही काँग्रेसला जिंकता आल्या नाहीत. तरी देखील काँग्रेस आताच्या निवडणुकीत या बाराही राज्यांत सर्वच्या सर्व जागा लढवत आहे. 2019 मध्ये काँग्रेसनं कर्नाटकात 21 जागा लढवल्या होत्या. यावेळी मात्र काँग्रेस या राज्यात सर्व जागा लढवत आहे.
2019 मध्ये या 13 राज्यांत जिंकल्या होत्या 16 जागा
(कंसाबाहेर राज्य व एकूण जागा, कंसात अनुक्रमे लढलेल्या व जिंकलेल्या जागा)
कर्नाटक -28 – (21- 01)
तेलंगणा – 17 – (17 – 03)
पंजाब – 13 – (13 – 08)
छत्तीसगड – 11 – (11- 02)
उत्तराखंड – 05 – (05 – 00)
हिमाचल प्रदेश – 04 – (04 – 00)
अरुणाचल प्रदेश – 02 – (02 – 00)
गोवा – 02 – (02- 01)
मेघालय – 02- (02 – 01)
मणिपूर – 02 – (02 – 00)
नागालँड – 01 – (01- 00)
सिक्कीम – 01 – (01- 00)
मिझोराम – 01 – (01 – 00)
एकूणच काय तर 2019 मध्ये या 13 राज्यांत लढलेल्या 82 पैकी अवघ्या 16 जागांवरच काँग्रेसला यश मिळालं होतं. इतकंच नव्हे तर या 13 राज्यांपैकी 07 राज्यांत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळं 2024 च्या लोकसभेसाठी या 13 राज्यांतील सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभं करण्याचं धाडस काँग्रेसनं दाखवलंय, हे विशेष!
हेही वाचा :
धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार
अनिल कपूर पुन्हा मु्ख्यमंत्री म्हणून दिसणार, नायक सिनेमाचा सिक्वेल येणार
बुलढाणा :लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात पाच दिवस सूर्यकिरणोत्सव