“डायनासोर’प्रमाणे काँग्रेस नष्ट होत चालला आहे”, राजनाथ सिंह यांचा घणाघात
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका सभेला(dinosaur figures) संबोधित करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस पक्षावर घणाघात केला. उत्तराखंड येथील गढवाल लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार अनिल बलूनी यांच्या समर्थनार्थ एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं.
यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंहे म्हणाले की, पुढच्या काही वर्षांमध्ये काँग्रेस पक्ष डायनासोरप्रमाणे(dinosaur figures) लुप्त होऊन जाईल. त्यांनी काँग्रेसची तुलना बिग बॉससोबत केली. काँग्रेसचे नेते रोज एक-दुसऱ्याचे कपडे फाडत आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या काही वर्षांनंतर लहान मुलंसुद्धा काँग्रेस पक्षाला ओळखणार नाहीत.
मागच्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. पक्ष सोडून गेलेले नेते एनडीएमध्ये सहभागी होत आहेत. या नेत्यांमध्ये मिलिंद देवरा, अशोक चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाले. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी दिली. तर मिलिंद देवरा शिवसेनेमध्ये सहभागी झाले आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, काँग्रेसमधून नेते पळून जात आहेत. एकानंतर एक पक्ष सोडत आहेत. बाहेर पडलेले नेते भाजप किंवा एनडीएमधील घटकपक्षांमध्ये सहभागी होत आहेत. मला भीतीय की, पुढच्या काही वर्षांत काँग्रेस पक्ष डायनासोरप्रमाणे लुप्त होऊन जाईल. काँग्रेस नेते रोज एक-दुसऱ्याशी लढत आहेत. टीव्ही शो बिग बॉसप्रमाणे ते एकमेकांचे कपडे फाडत आहेत, असं ते म्हणाले.
हेही वाचा :
फक्त पैसा-प्रसिद्धीसाठी.. नोरा फतेहीकडून बॉलिवूड कपल्सच्या लग्नाची पोलखोल
आता मेट्रोचं तिकीट काढण्याची गरजच नाही! प्रवाशांसाठी लाँच केलं ‘स्मार्ट बँड’
मित्रांसोबत दारु प्यायली, बाथरुममध्ये गेली आणि परत आलीच नाही; 30 वर्षीय गायिकेचा मृत्यू