भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्याचे स्वप्न होणार लवकर पूर्ण.

भारतीय लष्करामध्ये (Indian Army) नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंगची पदवी घेतली असेल आणि भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. भारतीय सैन्य दलामध्ये 140 व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी (TGC-140) भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा असणाऱ्या पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

भारतीय लष्कराच्या या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 30 पदे भरली जाणार आहेत. या 30 पदांमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदांवर अर्ज करण्याची इच्छा असणारे उमेदवार 9 मे किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा.

या पदांसाठी होणार भरती –

सिव्हिल- 7 पदे

कम्प्युटर सायन्स – 7 पदे

इलेक्ट्रिकल- 3 पदे

इलेक्ट्रॉनिक्स- 4 पदे

मेकॅनिकल- 7 पदे

विविध इंजिनिअरिंग स्ट्रीम- 2 पदे

अशी केली जाईल निवड –

SSB मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी, निवडक केंद्रांपैकी एकावर कटऑफ टक्केवारीच्या आधारे निवडलेल्या पात्र उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल.