रिचार्ज दरवाढीला ग्राहकांची चपराक; सिम कार्ड पोर्ट करण्यात भारतीयांनी केला विक्रम!
मोबाईल नेटवर्क सेवा पुरवठादार कंपन्या जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया(sim cards) यांनी महिनाभरापूर्वी 3 जुलैपासून रिचार्जचे दर वाढवले. त्याविरोधात देशभरातील ग्राहक संतापलेले पाहायला मिळत आहे. परिणामी, बीएसएनएलकडे ढुंकूनही न पाहणारे ग्राहक सुद्धा आता बीएसएनएलच्या यादीत आले आहे. या दरवाढीचा निषेध म्हणून ग्राहकांनी बीएसएनएलकडे आपला मोबाईल क्रमांक पोर्ट केला आहे. सिम पोर्ट करण्यात भारतीयांनी नवीन जागतिक विक्रम केला आहे.
भारतीय दूरसंचार विभागाने मोबाईल(sim cards) युझर्सला विना क्रमांक बदलता नेटवर्क पुरवठादार बदलण्याची सुविधा दिली आहे. म्हणजे ग्राहक जिओचे सिम वापरत असेल तर त्याला त्याच्या आवडीनुसार, दुसर्या कंपनीची सेवा घेता येते. त्याला दूरसंचार पुरवठादार बदलता येतो.
दूरसंचार विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार, रिचार्ज महागल्यानंतर ग्राहकांनी त्याला सिम पोर्टने उत्तर दिले. 3 जुलै रोजी सर्वच सिम कार्ड कंपन्यांचे रिचार्ज महागले. आतापर्यंत मोबाईल नंबर पोर्टबिलिटी सेवाने 100 कोटींचा आकडा पार केला. एमएनपी सेवा भारतात 20 जानेवारी 2011 रोजी सुरु झाली होती. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानुसार, (ट्राय) भारतात सरासरी प्रत्येक महिन्याला जवळपास 1.1 कोटी मोबाईल सिम पोर्ट करण्यासाठी विनंती येते.
ट्रायच्या आकडेवारीनुसार, भारताने पोर्टिबिलिटीमध्ये नवीन रेकॉर्ड केला आहे. रिचार्ज महागल्यानंतर भारताने आतापर्यंत 100 कोटींचा आकडा गाठला. मे 2024 मध्ये 1.2 कोटी मोबाईल क्रमांक पोर्ट करण्यात आले होते. मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी ग्राहकांना 7 दिवसांची प्रतिक्षा करावी लागते.
खासगी कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या दरात मोठी वाढ केली. प्लॅनचे दर 11 टक्के ते 25 टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. एअरटेल, व्होडाफोनचे 28 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन यापूर्वी 199 रुपयांना होता. तर जिओचा प्लॅन 189 रुपये होता. त्या तुलनेत बीएसएनएलचा प्लॅन फक्त 108 रुपयांमध्ये आहे. तसेच 107 रुपये ते 199 रुपयांपर्यंत बीएसएनएलचे 4-5 प्लॅन आहेत. ते इतर कंपन्यांच्या प्लॅनच्या तुलनेत स्वस्त आहेत. बीएसएनएल सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
हेही वाचा :
‘टॅाक्सिक’मध्ये कियाराची एन्ट्री, यशसोबत 2 अभिनेत्री करणार रोमान्स
फिल्मी स्टाईल दरोडा; ज्वेलर्सचं दुकान लुटलं अन् हवेत गोळीबार करत पळून गेले Video
१ ऑगस्टपासून होणार ५ मोठे बदल; गॅस सिलिंडरपासून बँक खात्यावर परिणाम होणार