शिंदे गटाच्या नेत्याच्या संबंधित गाडीत सापडले कोट्यवधी रुपये!
आज राज्यात विधानसभा निवडणूक(political news) पार पडत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक घडामोड घडली आहे. यावेळी निवडणुकीच्या रणधुमाळीतच इनोवा कारमध्ये कोट्यवधी रुपये सापडले आहेत. त्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गोरेगाव पूर्व दिंडोशी विधानसभेचे शिंदे गटाचे उमेदवार संजय निरुपम यांच्याशी संबंधित ही कार असल्याची चर्चा आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, एक इनोवा कार मंत्री पार्क सोसायटीच्या समोर उभी होती. यामधून तब्बल कोट्यवधी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी कार जप्त केली असून थेट इनोवा कार ही पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत. मात्र या कारवर शिंदे गटाच्या(political news) नेत्याचा स्टीकर असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
मात्र या घटनेसंदर्भात पोलीस चौकशी करत आहेत. तसेच इनोवा गाडीमध्ये सापडलेले पैसे कोणाचे आहेत? याचा शोध सध्या सुरु आहे. तसेच निवडणुकीआधी इतकी मोठी रक्कम कारमध्ये का ठेवण्यात आली होती? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
याशिवाय काल भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर देखील पैसे वाटपाचा आरोप झाला होता. मात्र या घटनेवरून मोठा गदारोळ झाला होता. यावेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर तब्ब्ल 5 कोटी रुपये आणून वाटल्याचा धक्कादायक आरोप केला होता.
मात्र भाजप नेते विनोद तावडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने या सर्व प्रकरणाची चौकशी करावी असंदेखील विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
‘मला दहा मिनिटं…’; विनोद तावडेंचा आणखी एक खळबळजनक व्हिडिओ समोर
‘फार झालं, आता मला अजून….,’ घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने व्यक्त केल्या भावना
आधी गळा कापला, नंतर डोळे फोडून भरले गहू अन् मोहरी; तांत्रिक विधीसाठी तरुणाचा नरबळी