पिक विम्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना पिक विम्यासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे.(extended)दरम्यान, आता फळपिक विमा योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. हवामान आधारित फळपिक विम्यासाठी अर्जाची शेवटची तारीख वाढवून देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी माहिती दिली आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या योग्य समन्वयामुळे पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता ६ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करता येणार असल्याचे कृषिमंत्री अॅड. कोकाटे यांनी सांगितले.
फळपिक विमा योजनेअंतर्गत मृग बहार २०२५ मध्ये द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू, मोसंबी या पिकांसाठी विमा योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.(extended) यासाठी अंतिम तारीख ३० जून २०२५ होती.ही तारीख वाढवण्यात आली आहे.आता ३ ते ६ जुलै अशी मुदतवाढ केली आहे. अर्ज करण्यासाठी २७ जून २०२५ पासून आधार संकेतस्थळाबाबत समस्या येत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. यानुसार शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या www.pmfby.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन विमा योजनेचा अर्ज करावा, असं माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं आहे.
पिक विम्यासाठी अर्ज करताना तुमच्याकडे फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. (extended)जर तुम्ही अजूनही फार्मर आयडी काढले नसेल तर अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. यासाठी सोपी प्रोसेस आहे.
हेही वाचा :