दीपिकाने शेअर केले बेबीमूनचे फोटो, मानेवरच्या टॅटूने वेधलं लक्ष

अभिनेत्री दीपिका पदुकोणविषयी अपडेट्स जाणून घेण्यास तिचे चाहते(tattoo) सतत उत्सुक असतात. लवकरच आई होणार असल्यामुळे दीपिका सध्या जास्तीत जास्त वेळ स्वतःसोबत स्पेंड करतेय. नुकतंच रणवीर आणि दीपिका एका छोट्याशा व्हेकेशनवरून परतले आहेत. तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमुळे सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दीपिकाने सोशल मीडियावर तिचा पाठमोरा(tattoo) शेअर केला असून तिच्या पाठीवरचं बेबीमून टॅन या फोटोमध्ये दिसतंय. तिने या फोटोच्या कॅप्शन मध्ये नवरा रणवीर सिंगला टॅग करत बीच आणि लाटांचे ईमोजी शेअर केले आहेत. रणवीरने या फोटोवर “मला पुन्हा त्या हळू चालणाऱ्या जगात घेऊन जा” अशी कमेंट केली. तर दीपिकाच्या मानेवरच्या टॅटूने सुद्धा लक्ष वेधून घेतलं. दीपिकाच्या मानेवर तिचा पुर्वश्रमीचा प्रियकर रणबीर कपूरच्या नावाचा ‘RK’ असं गोंदलेला टॅटू होता. हा टॅटू आता तिने मिटवला असल्याचं या फोटोतून लक्षात येतंय. तिने तिचा हा टॅटू लेझर ट्रीटमेंटने मिटवल्याचं म्हंटल जातंय.

दीपिकाच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिला टॅन मिटवण्याचा टिप्स दिल्या. काहींनी तिला ‘सनस्क्रीन का लावलं नाहीस?’ असा प्रश्न केला. तर काहींनी तिला टॅन घालवण्यासाठी घरगुती उपाय सांगितले. अनेकांनी तिला काळजी घ्यायला सांगितली.

सप्टेंबरमध्ये दीपिका आणि रणवीरच्या बाळाचं आगमन होणार आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट शेअर करत बाळाच्या आगमनाची घोषणा केली. या आधीही रणवीरने बाळाविषयीचा त्याचा उत्साह अनेक मुलाखतींमध्ये शेअर केलाय. अनंत अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यातसुद्धा हे दोघे उत्साहाने सहभागी झाले होते.

रणवीर आणि दीपिका आता सिंघम अगेन या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसेच ती कल्की २८९८ एडी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्याही या सिनेमात भूमिका आहेत. तर रणवीरसुद्धा डॉन ३ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. फरहान अख्तर या सिनेमाची निर्मिती करतोय.

हेही वाचा :

राहुल गांधींची मोठी घोषणा; महिलांच्या खात्यात महिन्याला जमा करणार 8500 रुपये

हार्दिक पंड्याला झाली दुखापत? वर्ल्डकप पूर्वीच टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या!

ठरलं! लोकसभा निवडणुकीत कंगना रणौतच्या विरोधात उभा राहणार काँग्रेसचा ‘हा’ नेता