अजय-अतुलच्या गाण्यांची जादू, नीता अंबानींचा ‘झिंगाट’वर डान्स

मुंबई : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स इथंल रिलायन्स उद्योग(songs) समुहातर्फे गेल्या नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र अर्थात NMACC उभारण्यात आलं. भारतीय कलेचं संवर्धन करण्याच्या हेतुने या केंद्राची स्थापना करण्यात आल्याचं नीता अंबानी यांनी सांगितलं. या ‘एनएमएसीसी’ला ३१ मार्च रोजी एक वर्ष पूर्ण झालं. याच निमित्तानं एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘द ग्रेट इंडियन म्युझिकल : सिव्हिलायझेशन टू नेशन’ अंतर्गत अनेक शो गेल्या वर्षभरात पार पडले.

मराठमोळे गायक(songs) आणि संगीतकार अजय-अतुल ‘द ग्रेट इंडियन म्युझिकल : सिव्हिलायझेशन टू नेशन’ शी जोडलं गेले आहेत. आता ‘एनएमएसीसी’ची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्तानं आयोजित एका खास कार्यक्रमात अजय-अतुल यांच्या गाण्यांनी NMACC दुमदुमलं. ‘अजय-अतुल लाइव्ह’ या कार्यक्रमामध्ये त्यांनी सर्वांचीच मनं जिंकली. NMACC च्या संस्थापक नीता अंबानी यांनी #OneYearAtNMACC सोहळ्यासाठी खास मराठमोळ्या अंदाजात हजेरी लावली होती. या खास सोहळ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या खास सोहळ्यात अनेक गायक-गायिकांनी आपली गाणी सादर केली. अजय- अतुल यांची गाणी लाइव्ह ऐकल्यानंतर उपस्थितांनी एकच ठेका धरला होता. या व्हिडिओत पाहायला मिळतंय की, अजय-अतुलच्या परफॉर्मन्सनी प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडलं होतं. तसंच अजय-अतुलचं झिंगाट गाणं लागलं आणि नीता अंबानी देखील थिरकताना दिसल्या. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

‘अजय-अतुल लाइव्ह’ शोमध्ये नीता अंबानी यांनी मराठीतून प्रेक्षकांचे आभार मानल्याचं पाहायला मिळालं. नीता अंबानी म्हणाल्या की, ‘तुम्ही आहात म्हणूनच या सर्व कला जिवंत आहेत, तुम्ही आहात म्हणून भारतीय संस्कृतीचा वारसा जिवंत आहे आणि तुम्ही आहात म्हणूनच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आहे.’ असं म्हणत त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले. त्याशिवाय अजय-अतुल यांचंही नीता यांनी कौतुक केलं.

NMACC मध्ये अत्याधुनिक असं तीन मजली ‘द ग्रँड थिएटर’ उभारण्यात आलंय. या थिएटरची आसन क्षमता २००० इतकी आहे. या थिएटरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची डॉल्बी अॅटमॉस ध्वनी यंत्रणा उभारण्यात आली असून, अकौस्टिक सिस्टिम आणि सर्वोत्तम प्रकाश व्यवस्था आहे. या थिएटरमध्ये भाषांतराची सुविधा उपलब्ध आहे. याठिकाणी १८ डायमंड बॉक्सचा वापर करण्यात आलाय.

हेही वाचा :

लोकसभेचा धुरळा अन् प्रचाराचा ‘शरद पवार’ पॅटर्न भर पावसात गाजवल्या सभा!

डीपफेक टेक्निकचा धोका वाढला, इंटरनेट विश्वात वावरताना महिलांनी राहावे सावध

‘तो माझ्या डोक्यावर कसा मारू शकतो? मी त्याला इतका मारेल…’ विराट कोहली कोणाबद्दल म्हणाला असा?