सावधान! १० मिनिटात… धोनीची मैदानात एन्ट्री अन् क्विंटन डी कॉकच्या पत्नीला गेला अलर्ट मेसेज

काल लखनौ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये(wife) सामना झाला. या सामन्यात लखनौने चेन्नईवर मात करत ८ गडी राखून दणदणीत विजय संपादन केला. चेन्नईचा पराभव झाला तरी महेंद्रसिंग धोनीच्या तुफानी खेळीने सर्वांचेच मन जिंकले. यावेळी धोनीची मैदानावर एन्ट्री होताना प्रेक्षकांनी असा गोंधळ केला की थेट स्मार्ट वॉचवर अलर्ट मेसेज येऊ लागले. याबाबत क्विंटन डी कॉकच्या पत्नीने केलेल्या खास पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

क्रिकेटमध्ये सध्या आयपीएलचा(wife) रणसंग्राम सुरू आहे. नेहमीप्रमाणे आयपीएलमध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती ‘चेन्नईचा सुपर किंग’ महेंद्रसिंग धोनीची. चेन्नईच्या प्रत्येक सामन्यात धोनीचा जलवा पाहायला मिळतोय. धोनीची मैदानावर एन्ट्री होताच प्रेक्षक टाळ्या, शिटट्या, आरोळ्यांनी मैदान अक्षरश: डोक्यावर घेत आहेत. हेच चित्र कालच्या लखनौविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले.

सामन्यात महेंद्रसिंग धोनी फलंदाजीसाठी बाहेर आल्यानंतर संपूर्ण मैदानात धोनीच्या नावाच्या घोषणा होऊ लागल्या. यावेळी मैदानावर गोंधळ इतका होता की स्मार्ट वॉचवरही अलर्टचे मेसेज येऊ लागले. याबाबत लखनौचा खेळाडू क्विंटन डी कॉकच्या पत्नीने पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिच्या स्मार्ट वॉचवर एक अलर्ट मेसेज आल्याचे तिने म्हटले आहे.

या मेसेजमध्ये मैदानात एवढा गोंगाट आहे की जर कोणी येथे 10 मिनिटे सतत थांबले तर तो बहिरे होऊ शकत, असा धोक्याचा इशारा देण्यात आल्याचे दिसत आहे. सध्या तिची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. दरम्यान, कालच्या सामन्यात धोनीने पुन्हा स्फोटक फलंदाजी करताना अवघ्या ९ चेंडूत २८ धावा कुटल्या.

हेही वाचा :

मॅच फिक्सिंग? काँग्रेस उमेदवाराच्या नावासमोर ‘कॅन्सल स्टॅम्प,’ कार्यकर्त्यांचा आक्षेप

मोठी बातमी! शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

‘इंडिया आघाडी’ स्वार्थासाठी एकत्र; काँग्रेस विकासाच्या वाटेतली भिंत.. नांदेडच्या सभेत PM मोदी कडाडले!