दिनेश कार्तिक आयपीएल २०२५ मध्ये CSK च्या ताफ्यात?

 

दिनेश कार्तिक देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळतो आणि त्याने अनेकदा या संघाचे नेतृत्व(Leadership) केले आहे. पण इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याला कधीही सीएसकेकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

आयपीएल २०२४ चा हंगाम आता एका रोमांचक वळणावर पोहोचली आहे. केकेआर, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी आधीच प्लेऑफ्समध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता फक्त एकच जागा रिक्त आहे. यासाठी सीएसके आणि आरसीबी यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. या दोन संघांमधील(Leadership) सामना १८ मे रोजी बंगळुरूत खेळवला जाईल आणि एक संघ टॉप ४ मध्ये स्थान मिळवेल. या हाय व्होल्टेज मॅचपूर्वी दिनेश कार्तिकच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर ऋतुराज गायकवाडने मजेशीर प्रश्न विचारला आहे.

व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटमध्ये कार्तिकने त्याच्या मित्रांना आणि चाहत्यांना प्रश्न विचारायला सांगितले होते.अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने कार्तिकला विचारले की त्याची पुढील आयपीएल फ्रँचायझी कोणती आहे? चेन्नई सुपर किंग्ज? यावर कार्तिकने मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला, ‘भूमिका काय आहे ते सांग? तू मला कर्णधार बनवशील का?’ यासोबतच यष्टीरक्षक फलंदाजाने हसणारा इमोजी पोस्ट केला आहे.

दिनेश कार्तिक हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून खेळतो आणि त्याने अनेक वेळा या संघाचे नेतृत्व केले आहे. पण इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये त्याला कधीही चेन्नई सुपर किंग्जकडूनखेळण्याची संधी मिळाली नाही. राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या पॉडकास्ट ‘कुट्टी स्टोरीज’मध्ये बोलताना कार्तिकने एकदा सांगितले की, चेन्नई सुपर किंग्जकडून खेळू न शकल्याबद्दल त्याला खेद वाटतो.

हेही वाचा :

दहावी-बारावीच्या निकाला बाबत मोठी अपडेट

सामना रद्द झाल्यानंतर काव्या मारनने मारली गुजरातच्या या खेळाडूला मिठी

संजयकाकांची कदमांवर सडकून टीका, मित्र विशाल पाटलांनी ढाल बनून जशास तसं दिलं प्रत्युत्तर