डॉन अरूण गवळीची तुरुंगातून कायमची सुटका; या नियमामुळे डॅडी बाहेर येणार?

अंडरवर्ल्ड डॉन, कुख्या गँगस्टर अरूण गवळी उर्फ डॅडी याची मुदतपूर्व सुटका करण्यात यावी असे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. एक महिन्याच्या आत अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे कोर्टाचे निर्देश देण्यात आले आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन, कुख्या गँगस्टर अरूण गवळी उर्फ डॅडी (court)याची मुदतपूर्व सुटका करण्यात यावी असे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. एक महिन्याच्या आत अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे कोर्टाचे निर्देश देण्यात आले आहेत. 2006 सालच्या शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॅान अरुण गवळीनं शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. अखेर नागपूर खंडपीठाने अरूण गवळी याच्या सुटकेचे निर्देश देत यासंदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही देण्यात आला आहे.

नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात (court)अरूण गवळी उर्फ डॅडी याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तसेच इतर गुन्हेगारी कृत्यासाठीही त्याला जन्मठेप ठोठावण्यात आली. सध्या अरुण गवळी नागपूच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

गँगस्टर अरुण गवळीच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, कोर्टानं निकाल राखून ठेवला होता. त्यावर आज निर्णय देताना नागपूर खंडपीठाने अरुण गवळी याच्या मुदतपूर्व सुटकेचे निर्देश दिले. मात्र, त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे. आता जेल प्रशासन काय निर्णय घेणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

10 जानेवारी 2006 रोजीच्या शासन निर्णयानुसार,(court) वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या, शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहातून मुक्त करण्याची तरतूद आहे. याच ग्राऊंडवर अरुण गवळीला दिलासा मिळालाय. या शासन निर्णयाच्या आधारेच डॉन अरुण गवळीने शिक्षेतून मुदतीपूर्व सुटकेची मागणी केली होती, आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात गृह विभाग आणि इतर प्रतिवाद्यांना हरकती घेण्यासाठी न्यायलयाने चार आठवड्यांचा अवधी दिला आहे.

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात अरूण गवळी यावा जन्मठेपेची शिक्षा झाली. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. ही घटना 2 मार्च 2007रोजी घडली होती. कमलाकर जामसंडेकर यांचं त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नावाच्या इसमासोबत प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. सदाशिवनेच गवळीच्या हस्तकांमार्फत ही सुपारी दिली होती.  त्यानंतर अरूण गवळीने या सुपारीची प्रताप गोडसेला जबाबदारी दिली होती. 2 मार्च रोजी कमलाकर जामसंडेकर यांची हत्या करण्यात आली.

हेही वाचा :

महाराष्ट्र हादरलं! स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

सर्व सामान्य जनतेला वीज दरवाढीचा ‘शॉक’ ! 

२०२४ साठी बाबा वेंगांची भविष्यवाणी!