या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला ‘थाला’

चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2024 या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये(bat control) दिसत आहे. तो शेवटच्या काही ओव्हरमध्ये वेगाने धावा काढत आहे. आणि आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्यात चांगले योगदान देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

या उत्कृष्ट लयीत असूनही तो अत्यंत कमी फलंदाजी करत आहे, त्यामुळे कॅप्टन(bat control) कूलवरही टीका होत आहे. धोनीच्या बचावात अनेक तज्ञ याला रणनीतीचा एक भाग म्हणत आहेत. पण आता त्यामागचे कारण समोर आले आहे.

खरंतर, चेन्नई सुपर किंग्जच्या माजी कर्णधाराला पायाच्या स्नायूंना दुखापत झाली आहे. आणि त्यामुळेच तो फलंदाजीसाठी खाली येत आहे. वरच्या क्रमाने न येणे त्याच्यासाठी मजबुरी आहे असे सूत्रांनी सांगितले की, धोनीच्या पायाला दुखापत झाली तरी तो आयपीएल 2024 खेळत आहे.

रिपोर्टनुसार, महेंद्रसिंग धोनीला आयपीएल 2024 च्या सुरुवातीला पायाच्या स्नायूला दुखापत झाली होती. चेन्नईचा दुसरा यष्टिरक्षक-फलंदाज डेव्हॉन कॉनवे उपलब्ध असता तर धोनीने विश्रांती घेण्याचा विचार केला असता. पण कॉनवेच्या अनुपस्थितीत धोनीकडे फारसे पर्याय नव्हते.

धोनी आयपीएल 2023 मध्ये गुडघ्याच्या दुखापतीने खेळला होता, ज्यावर चेन्नईने हंगाम जिंकल्यानंतर लगेचच शस्त्रक्रिया करावी लागली. अहवालात असे सूचित होते की गुडघा बरा झाला आहे. परंतु स्नायूंच्या ताणामुळे मैदानावरील त्याच्या हालचाली मर्यादित आहेत. सराव सत्रादरम्यान धोनी अजिबात धावत नाही आणि त्याची संपूर्ण तयारी मोठे षटकार मारण्याची असते.

हेही वाचा :

अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! 

टी20 वर्ल्ड कपमध्ये ‘या’ जर्सीत खेळणार टीम इंडिया? नव्या जर्सीचे फोटो लीक

टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाच्या नव्या जर्सीचं केलं अनावरण