टी20 वर्ल्ड कपमध्ये ‘या’ जर्सीत खेळणार टीम इंडिया? नव्या जर्सीचे फोटो लीक

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या मिशन ‘टी20 वर्ल्ड कप’ला 5 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया(Team India) आपला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. येत्या 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला चार आठवड्यांचा अवधी बाकी आहे, भारतीय क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट संघही जाहीर केलाय.

या दरम्यान बीसीसीआयकडून(Team India) स्पर्धेच्या तयारीचा आढावाही घेतला जात आहे. यासाठी बीसीसीआयने काही अधिकाऱ्यांना अमेरिका दौऱ्यावर पाठवलं होतं. अमेरिकेत टीम इंडियाचं सराव शिबिर आणि इतर सुविधांबाबत आढावा घेण्यासाठी हा दौरा होता.

बीसीसीआयकडून तयारीचा आढावा घेतला जात असतानाच आता नवी माहिती समोर आली आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया नव्या जर्सीत मैदानात उतरणार असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर या नव्या जर्सीचा पहिला लूक व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारी टीम इंडियाची नवी जर्सी व्ही शेप गळ्याची असू यावर भारतीय तिरंग्याचा स्ट्रीप आहे. खांद्यापासून हातापर्यंत भगवा रंग आहे. यावर सफेद पट्ट्या आहेत. जर्सीची पुढची बाजू निळ्या रंगाची असून यावर उजव्या बाजूला आदिदास आणि डाव्या बाजूला बीसीसीआयचा लोगो आहे. अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची ही अधिकृत जर्सी असल्याचा दावा या व्हायरल फोटोबरोबर करण्यात आला आहे.

हेही वाचा :

बाळासाहेब आज असते तर धु धु धुतलं असतं; शिंदेंचा ठाकरेंवर शाब्दिक हल्ला

‘धर्मवीर’मधील राजन विचारेंचा ‘तो’ सीन खोटा; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता