निवडणूक आयुक्तांचा मर्डर करेल, म्हणणारे माजी मंत्री अडचणीत

सावजी हे नुसती धमकी देऊन थांबले नाही तर त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना धमकीचे पत्र पाठवले होते(minister). या पत्रामुळे पोलिस, प्रशासन यंत्रणेला जाग आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाला खुनाची धमकी देणं, मात्री मंत्र्यांच्या(minister) अंगलट आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात पाच टप्य्यातील मतदान झाले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत माजी मंत्री सुबोध सावजी थेट निवडणूक आयोगाला धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी दिलेल्या धमकीची दखल घेत पोलिसांनी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.

“जर निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला तर मी त्यांचा खून करेल, मर्डर करेल,” अशी धमकी सावजी यांनी दिली होती. सावजी हे नुसती धमकी देऊन थांबले नाही तर त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना धमकीचे पत्र पाठवले होते. या पत्रामुळे पोलिस, प्रशासन यंत्रणेला जाग आली आहे. पोलिसांनी सुबोध सावजी यांच्यावर डोणगाव येथील पोलिस स्टेशन मध्ये कलम 506 अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

श्रुती हासन आणि शांतनु हजारिकाचा ब्रेकअप…

कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचा दुचाकीस्वारांना दणका

धक्कादायक! 8,000हून अधिक आयआयटीयन विद्यार्थी बेरोजगार