“आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करून फडणवीस दिल्लीला जाणार होते, पण…”, ठाकरेंचा मोठा दावा

साल 2019. विधानसभेच्या निवडणुका(old delhi) झाल्यानंतर भाजप-शिवसेना पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. पण, सत्तेचं सम-समान वाटप करण्याचं शब्द गृहमंत्री अमित शाह यांनी ‘मातोश्री’त दिल्याचा दावा करत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर युती तोडली आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं, शिवसेनेत फूट पडल्यानं पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

“आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करून देवेंद्र फडणवीस दिल्लीला(old delhi) जाणार होते. खुद्द फडणवीस यांनीच मला हे सांगितलं होतं. मात्र, फडणवीसांनी मला माझ्याच लोकासंसमोर खोटं ठरवलं,” असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार, असं वचन मी बाळासाहेबांना दिलं होतं. शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तेचं सम-समान वाटप होईल. शिवसेना आणि भाजपकडे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद पद असेल, असं अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत ठरलं होतं. आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करून देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार होते. खुद्द फडणवीस यांनीच मला हे सांगितलं होतं. मात्र, फडणवीसांनी माझ्याच लोकांसमोर मला खोटं ठरवलं.”

“भाजप हा पक्ष वॉशिंग मशिन आहे. त्यांनी प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण आणि अजित पवारसांरख्या भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन क्लिनचिट दिली आहे. पक्ष तोडणे, घर तोडणे, छापे मारणे ही भाजपची हमी आहे. नोटबंदीनंतर मला 100 दिवस द्या, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. एप्रिल 2024 मध्ये 2700 दिवस झाले, त्याचं काय झालं? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं मोदींनी सांगितलेलं. पण, केवळ शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला,” अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

हेही वाचा :

उदयनराजेंच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची सभा; ठिकाण अन् तारीखही ठरली

Israel-Iran युद्धाचा भारतावर काय होणार परिणाम; तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

आर्थिक मंदीची चाहूल? देशातील आघाडीच्या टॉप 3 आयटी कंपन्यांमध्ये 63,759 कर्मचारी झाले कमी