उदयनराजेंच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची सभा; ठिकाण अन् तारीखही ठरली

महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार छत्रपती उदयनराजे भोसले(promote) यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 30 एप्रिलला कराडला जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनाबाबत सध्या तयारीला वेग आला असून कराडमधील भाजपच्या कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी याबाबत मैदानाची पाहणी केली. सभेच्या नियोजनासाठी शनिवारी ( 20 एप्रिल ) साताऱ्यात कोअर कमिटीची बैठक होणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली आहे

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे(promote) उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे अशी सरळ लढत होत आहे. दोन्ही बाजूकडून स्टार प्रचारकांसह दिग्गज नेत्यांच्या सभांचे जोरदार नियोजन सुरु आहे. भाजपच्या वतीने उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे नियोजन केले आहे.

येत्या 30 एप्रिलला कराडमध्ये ही सभा होणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरु आहे. शुक्रवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी कराडमधील मैदानांची पाहणी केली. दरम्यान, शनिवारी सातारा भाजप कार्यालयात प्रदेश निवडणूक प्रभारी निर्मलकुमार सुराणा यांच्यासोबत बैठक होणार आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले.

या बैठकीत सभेच्या नियोजनाची चर्चा होणार आहे. तसेच लवकरच सभेची नेमकी वेळ दिली जाणार आहे. त्यामुळे मोदींच्या कराडमधील सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

Israel-Iran युद्धाचा भारतावर काय होणार परिणाम; तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

रेसिपी : लसणाचा चहा पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे

लॉरेन्स बिश्नोईची पुन्हा सलमान खानला धमकी? कॅब बुकिंग करून अभिनेत्याच्या..