‘या’ प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचा मित्रासोबतचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल!
सोशल मीडियावर(social media) गेल्या काही दिवसात अनेक सिलिब्रेटी, रिल स्टार यांचे डिप फेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. रश्मीका मंदाना, आलिया भट्ट या अभिनेत्रींचे देखील काही डिप फेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा एकदा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावरील(social media) प्रसिद्ध स्टार मिनाहिलचा MMS व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मिनाहिल मलिक पाकिस्तानी असून सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोईंग पहायला मिळते. दरम्यान, मिनाहिलाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एवढंच नाहीतर याबद्दल वाद वाढत आहे. यावेळी सोशल मीडिया स्टारने यावर प्रतिक्रिया दिली असून व्हिडीओबाबत खुलासाही केला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा फेक असल्याचं मिनाहिलने म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये मिनाहिल तिच्या मित्रासोबत असल्याचा दावा करण्यात आला. पण व्हायरल होत असलेला व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे आणि त्यामध्ये काहीही तथ्य नाही, असा खुलासा करत मिनाहिल हिने व्हिडीओबाबत तक्रार दाखल केली आहे.
पुढे ती म्हणाली की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ फेक आहे. याबाबत मी तक्रार देखील दाखल केली आहे आणि असं कृत्य करणाऱ्याला लवकरच अटक केली जाईल. ज्याच्या मनात महिलांबद्दल आदर नाही अशी व्यक्ती असं कृत्य करु शकते ज्याच्या घरी आई – बहीण नाही, असं म्हणत मिनाहिल हिने चाहत्यांकडून मदतीची विनंती केली आहे.
हेही वाचा :
हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडने पहिल्या पत्नीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! पोस्ट व्हायरल
निवडणूक जिंकली, तरीही CMपद जाणार; शिंदेंना धक्का? महाशक्तीचा नवा फॉर्म्युला ठरला
कोल्हापूर जिल्ह्यातील ‘या’ चार मतदारसंघात भावांच्या तुलनेत लाडक्या बहिणी सर्वाधिक मतदान करणार!